कोरियन बापाला हिंदी गाण्याची भुरळ; बाळासाठी गायले 'हे' लोकप्रिय गाणं, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज काही ना काही वेगळ पाहायला मिळत असते. जगाच्या एका कोपऱ्यात बसून जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात काय सुरु आहे हे सहज कळते. सध्या सोशल मीडियावर असाच एक कोरियातून हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका कोरियन वडिलांनी आपल्या लहान बाळासाठी हिंदीत गाणे म्हटले आहे. चंदा है तू, मेरा सूरज है तू’ गाणे गाताना एक व्यक्ती दिसत आहे. ते आपल्या बाळाला झोपवण्यासाठी अंगाई गीत गात आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत असून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
वडीलांचे आपल्या बाळाशी असलेले नाते काही औरच असते. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, वडील आपल्या बाळाला प्रेमाने पाहत मेरे सुहान असे म्हणतात. बाळ ही अगदी हसत हसत त्यांच्याकडे पाहत असते. नंतर ते हिंदीत मेरा चंदा है तू गाणे गुणगुणू लागतात. त्यांच्या मोहक उच्चारासह बाळाच्या चेहऱ्यावरही आनंदाचे भाव उमटतात. हा व्हिडिओ पाहून अनेकांचे हृद्य भरुन आले आहे. हिंदीतील त्यांचा गोड आवाज आणि आपल्या बाळावरील त्यांचे प्रेम यातून दिसत आहे. हा व्हिडिओ अनेकांच्या मनाला भावला आहे. मायेला भाषेचे बंधन नसते हे देखील या व्हिडिओतून पाहायला मिळत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
हा व्हिडिओ सोशल मीडियावर mylovefromkorea17 या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. नेहा अरोरा नावाच्या महिलेने हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडितील व्यक्ती तिचा नवरा असून ती आपल्या नवऱ्याला हिंदी शिकवते. यापूर्वीही तिने अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. यामध्ये तिचा नवरा हिंदी शिकत असून आपल्या संस्कृतीशी जूळवून घेताना दिसत आहे. तसचे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी प्रेम हेच प्रत्येक नात्याचे खरे सौंदर्य असते असे म्हटले आहे. काहींनी वडिलांचे असे प्रेम मिळणे खूप नशीबवान असावे लागते. हा गोंडस आणि भावनिक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.