(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मीडिया एक असे प्लॅटफार्म आहे जिथे नेहमीच काही ना काही घडत असत. इथे कधी धोकादायक स्टंट्स शेअर केले जातात तर कधी जीवघेणे अपघात, यासोबतच काही हास्यास्पद व्हिडिओ देखील इथे शेअर होतात जे पाहून आपल्याला हसू अनावर होईल. आता मात्र इथे एक हृदयद्रावक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात जंगलातील काही थरार दृश्य दिसून आले. जंगलातील शिकाऱ्याने आईसमोर मुलाला फाडून खाल्लं आणि हे दृश्य पाहून सर्वांचच मन हेलावून उठलं. चला नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
जीवाशी खेळ! धावत्या ट्रेनमध्ये चढायला गेले अन् स्वत:सोबत दोघांना घेऊन पडले काका ; Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
सध्या प्राण्यांच्या जीवनाची संबंधित एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये हे निष्पाप म्हशीचे वासरू त्याचे शिकार बनताना दिसत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बिबट्याने त्याच्या आईजवळून तिचे विसरून हिरावून त्याची शिकार केली, ज्यांनंतर त्या आईचे काय झाले असेल याचा विचार करा… व्हायरल व्हिडिओमध्ये असे दिसून येते की एक म्हैस आणि तिचे वासरू जंगलात आनंदाने गवत चरत आहेत, त्यांना हे माहित नाही की एक बिबट्या वासरावर डोळे ठेवून बसला आहे. इथे, बिबट्याला संधी मिळताच, तो लगेच म्हशीच्या वासरावर हल्ला करतो आणि त्याला मारतो. इथे आई आपल्या मुलाला बिबट्यापासून वाचवण्यासाठी सर्व काही करते, पण शेवटपर्यंत ती आपल्या मुलाला वाचवू शकत नाही.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की बिबट्या त्याच्या आईपासून दूर जाण्याच्या संधीची पूर्णपणे वाट पाहत आहे. आता ही संधी मिळताच तो लगेच म्हशीच्या वासरावर हल्ला करतो आणि त्याची शिकार करायला सुरुवात करतो. दरम्यान, त्याची आई समोर आल्यावर तो मुलाला झुडपात घेऊन जातो आणि तिथेच मुलाला मारतो आणि ती आपल्या डोळ्यांनी हे दृश्य पाहत राहते. सर्व घटना इतकी वेगात होते की आईला काहीच करता येत नाही. हा व्हिडिओ जंगलातील भयाण सत्य व्यक्त करतो ज्यात नेहमीच बलवान प्राणी कमकुवत प्राण्यांची शिकार करत असतात. व्हिडिओतून जंगलातील आयुष्य सोपे नव्हे ते स्पष्ट होते.
Patiala Peg: दारूच्या पेगचे नाव कसे पडले ‘पटियाला पेग’, मनोरंजक कथा; तुम्हाला माहीतही नसेल
हा व्हायरल व्हिडिओ @lesitha_prabath नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो युजर्सने पाहिले असून अनेकांनी याच्या कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “खूप चपळ बिबट्या होता” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “खरा निसर्ग क्रूर असतो”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.