(फोटो सौजन्य: Facebook)
जंगलाचा राजा सिंह असला तरी आपल्या शक्तीमुळे जंगलाचा सर्वात धोकादायक शिकारी म्हणून वाघाची ओळख आहे. भारताचा राष्ट्रीय प्राणी देखील वाघ आहे, अशात वाघाचा तो रुतबा नेहमीच आपल्या मनात बनलेला आहे की तो एक बलाढ्य प्राणी आहे. पण नुकताच सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओने सर्वांचे होश उडवून ठेवले आहेत. व्हिडिओमध्ये वाघ एका कुत्र्याची शिकार करायला आलेला असतो पण त्याआधीच त्याची भेट एका उंदरासोबत होते, ज्यानंतर घाबरुन तो तिकडुन पळून जातो. वाघाचा हा भित्रेपणा आता सर्वांनाच आश्चर्यचकीत करत असून याचा व्हिडिओ सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात दिसते की, एक वाघ कुत्र्याती शिकार करण्यासाठी अंगणात शिरला आहे. वाघाला असं अंगणात पाहताच कुत्रा घाबरतो आणि तिथून पळ काढू लागतो. यावेळी तिथे एक उंदिर देखील उपस्थित असतो, ज्याच्याकडे वाघाचे प्रथम लक्ष जात नाही. पण काहीवेळातच तो त्याच्या जवळ उभ्या असलेल्या उंदराला पाहतो आणि लगेचच घाबरुन त्याच्यापासून दूर पळ काढू लागतो. कोणत्या भूताला पाहिलं असावं अशाप्रकारे वाघाची अवस्था होते आणि तो लगेचच भिंतीवरून उडी मारुन शिकार न करताच तिथून पळत सुटतो. शक्तीशाली वाघ एका चिटुकल्या उंदराला घाबरत आहे, हे पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. अनेकांनी भित्र्या वाघाच्या व्हिडिओची मजा लुटली तर काहींनी या दृश्यांना एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार केल्याचे म्हटले.
वाघाचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर आता चांगलाच शेअर केला जात असून @omfey G. Borj नावाच्या फेसबूक अकाऊंटवरून याला शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ज्यांना हे एआय आहे हे माहित नाही त्यांच्यासाठी मौन धराव” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “वाघाने टाॅम अँड जेरीमधील जेरीच्या भावाला पाहिलं” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “काय वाघ बनणार रे तू”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.