(फोटो सौजन्य: Twitter)
सोशल मीडियावर दररोज अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे लोक व्हायरल होण्यासाठी अनेक विचित्र गोष्टी करू पाहतात. यात जीवघेणे स्टंट्स, थरारक अपघात आणि जुगाड अशा व्हिडिओजचा समावेश आहे. इथे बऱ्याचदा अशा काही घटनाही शेअर होतात ज्यांची आपण अपेक्षाही केली नसावी. आताही इथे अशाच एका घटनेचा व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला आहे ज्यात एका तरुणी शॉपिंग करत असताना अचानक तिच्या पॉकेटमध्ये तिचा स्मार्टफोन फुटल्याची घटना घडली.
एवढेच नाही तर हा स्मार्टफोन फुटताच तिच्या पँटला आग लागली आणि काही समजण्याआधीच ही आग वाढत गेली. ही घटना काही साधी सुधी असून आता याचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ही संपूर्ण घटना दुकानातील कॅमेरात कैद झाली आणि आता याचा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. यात नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
सदर व्हिडिओ हा ब्राझीलचा असून इतक्या एका सुपरमार्केटमध्ये एक महिला शॉपिंग करत होती. व्हिडीओमध्ये सुपरमार्केटमध्ये लोकांची खरेदीसाठी झालेली गर्दी दिसत आहे. यावेळी अचानक महिलेच्या पँटच्या पॉकेटमधून धूर निघू लागतो. वृत्तानुसार, महिलेच्या मागच्या खिशात फोन होता ज्याचा स्फोट झाला आणि जिन्सला आग लागली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे तिथले वातावरण भीतीदायक होते. आपल्या खिशाला आग लागली आहे हे जाणवताच महिला इकडे तिकडे पळू लागते यावेळी तिचा पार्टनरदेखील ही आग विझविण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करताना दिसतो. यावेळी आजूबाजूची लोकही हे सर्व काय घडत आहेत या विचारात हे दृश्य दुरूनच पाहू लागतात आणि इथेच व्हिडिओचा शेवट होतो.
🇧🇷 PHONE EXPLODES IN SUPERMARKET, LEAVES WOMAN SEVERELY BURNED (NOT MADE IN ISRAEL)
A woman suffered 2nd and 3rd-degree burns when her cell phone exploded in her back pocket while she was grocery shopping in Anápolis, Brazil.
The phone was identified as Motorola Moto E32,… pic.twitter.com/R7XOXNZfSL
— SVS NEWS AGENCY (@svsnewsagency) February 12, 2025
माहितीनुसार, या घटनेत महिला गंभीर जखम झाली आहे. या आगीमुळे तिच्या शरीराचा काही भाग जळला तसेच यात तिचे काही केसही जळाल्याचे सांगितले जात आहे. घटनेचा व्हिडिओ @svsnewsagency नावाचया एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला, ‘ब्राझीलमधील ॲनापोलिस येथे किराणा मालाची खरेदी करत असताना तिच्या मागच्या खिशात मोबाईलचा स्फोट झाला. हा फोन मोटोरोला मोटो E32 या आहे जो एका वर्षापूर्वी खरेदी केला गेला. मोटोरोलाने या विचित्र घटनेची चौकशी करण्यासाठी महिलेशी संपर्क साधला आहे’ असे कॅप्शन देण्यात आले आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.