(फोटो सौजन्य: instagram)
जगभरात असे अनेक लोक आहेत जे कधी कधी अशा विचित्र युक्त्या करतात जे आश्चर्यचकित करतात आणि बऱ्याचदा हे जुगाड इतके अनोखे असतात की ते पाहून आपला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण होते. सोशल मीडियावर अशा अनोख्या जुगाडांचे अनेक व्हिडिओ शेअर केले जातात मात्र सध्या इथे ज्या जुगाडाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे तो पाहून तुमचा यावर विश्वासच बसणार नाही. या घटनेने आता अनेकांना हैराण केले असून लोक वेगाने हा व्हिडिओ शेअर करत आहेत. घटना महाराष्ट्रातील सातारा जिल्यातील आहे.
कोणत्याही ठिकाणी वेळेवर पोहोचण्यासाठी लोक काय करतील? आपण घरातून थोडे लवकर निघतो किंवा गाडीची मदत घेतो, पण नुकतेच एका विद्यार्थ्याने परीक्षेला वेळेवर पोहोचण्यासाठी असा जुगाड केला जो पाहून सर्वच हैराण झाले. त्याचा हा पराक्रम खरंतर आजवरचा सर्वात मोठा पराक्रमी जुगाड असेल. परीक्षा केंद्रावर उशिरा पोहोचू नये म्हणून मुलाने अशी युक्ती लावली की यासाठी त्याने कोणत्या रस्ते मार्गाचा किंवा ट्रेनचा अवलंब केला नाही थेट अवकाशमार्गे जाण्याचा निर्णय घेतला.
काय आहे प्रकरण?
सध्या इंटरनेटवर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ महाराष्ट्रातील सातारा येथील पसरणी गावातील असल्याचे सांगण्यात येत असून, परीक्षेला वेळेवर पोहोचण्यासाठी एका मुलाने लावलेला जुगाड आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुलाच्या या युक्तीची कल्पनाही कोणी करू शकत नाही. हा मुलगा परीक्षा देण्यासाठी पाठीवर बॅग घेऊन पॅराग्लायडिंग करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. समर्थ महानगडे असे या मुलाचे नाव असून त्याने परीक्षेला बसण्यासाठी पॅराग्लायडिंगची मदत घेतली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
तरुणाचा जुगाडाचा हा व्हिडिओ @insta_satara नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहले आहे, “सातारकरांच्या नादापुढं सगळ शून्य आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अभ्यास केला होता का पण”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.