देशभरामध्ये लोकसभा निवडणूकीची धामधुम सुरु आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदान देखील पार पडले आहे. मतदान देखील मोठ्या उत्साहात पार पडत आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील बोगस मतदानाचा प्रकार उघडकीस आला आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाली असून सदर व्हिडिओ भाजप उत्तर प्रदेशच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आलेली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी एका महिलेसोबत मतदान केंद्रावर पोहचली. तिला तिची ओळख विचारल्यानंतर तिने आठवीमध्ये शिकत असल्याचे सांगितले. मतदानाची स्लीप आल्यानंतर ती मुलगी मतदान करण्यासाठी आली होती. सदर व्हिडिओ संभळ लोकसभा मतदारसंघातील असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
08- सम्भल लोकसभा
विधानसभा कुंदरकी के बूथ नंबर 398 पर पीठासीन अधिकारी शमीम अहमद फर्जी वोटिंग करा रहा है। बूथ पर नाबालिग लड़की 40 वर्ष की महिला की वोटर पर्ची लेकर वोटिंग करने पहुंची। निर्वाचन आयोग घटना का तत्काल संज्ञान लेकर उचित कार्यवाही करे। @ecisveep @ceoup pic.twitter.com/0blWFtx1Pv
— BJP Uttar Pradesh (@BJP4UP) May 7, 2024
भाजपने हा व्हिडिओ शेअर करताना लिहिले आहे की, 08 – संभल लोकसभा कुंडरकी विधानसभेच्या बूथ क्रमांक 398 वर पीठासीन अधिकारी शमीम अहमद हे बनावट मतदान करत आहेत. एक अल्पवयीन मुलगी 40 वर्षीय महिलेची व्होटर स्लिप घेऊन मतदान करण्यासाठी बूथवर आली होती. निवडणूक आयोगाने या घटनेची तातडीने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी भाजपने केली आहे. नेटकऱ्यांनी देखील या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर कारवाईची मागणी केली आहे.