(फोटो सौजन्य: Instagram)
दिवाळीच्या सणात अनेकजण फटाके फोडून सण साजरा करतात. पण हे फटाके फोडताना सावधानगिरी बाळगणे गरजेचे आहे अथवा आपल्याला इजा होण्याची शक्यता असते. फटाक्यांमध्ये फोडली जाणारी माळ फारच लोकप्रिय पण तिला फोडताना एक विशेष अंतर राखून मग माळ फोडली जाते. पण नुकताच व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक वेगळेच दृश्य दिसून आले. काही लोक स्वतःचं पोट भरण्यासाठी जीव धोक्यात घालतात, आणि त्यांच्या धाडसाला खरंच सलाम करावासा वाटतो. असाच एक थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, ज्यात एका तरुणाने पैशांसाठी अक्षरशः मृत्यूला थोपवून धरले आहे.
काय घडलं व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये दिसतं की एक व्यक्ती आपल्या अंगाभोवती सुतळी बॉम्बसारख्या माळा गुंडाळतो. हे सर्व तो अतिशय शांतपणे आणि आत्मविश्वासाने करतो. नंतर त्यामधील एका वातीला तो पेटवतो आणि आजूबाजूचे लोक हतबुद्ध होऊन पाहत राहतात. माळ पेटवताच आगीचा प्रकाश आपल्याला दिसून येतो, ज्यात व्यक्तीचा जीव कासावीस होऊन सगळं सहन करत असतं. माळ फुटत असताना व्यक्तीला त्याचा फार त्रास होतो, त्याचे शरीर जळून निघत असते ज्यामुळे व्हिडिओत तो आपल्या होता-पायांनी धडपड करतानाही दिसून येतो. शेवटी माळ संपताच दुसरा व्यक्ती ओला कपडा घेऊन त्याचा पायाजवळ ठेवतो आणि इथेच व्हिडिओचा शेवट होतो. आपलं पोट भरण्यासाठी अजूनही कित्येक लोकांना नको नको त्या गोष्टी कराव्या लागतात आणि याचेच जिवंत उदाहरण व्हिडिओमध्ये दिसून आले.
हा व्हायरल व्हिडिओ @janusamir07 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “चुकीचं आहे हे, शुल्लक पैशांसाठी असा आपला जीव धोक्यात नाही घालायला हवा ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्यानेही हे केलं आहे ते खूप चुकीचं आहे” आणखीन एका युजरने लिहिलं आहे, “त्याला नक्कीच याचा त्रास झाला असेल”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.