याला म्हणतात जुगाडू डोकं! ५५ फूट उंच झाडावर चढण्यासाठी शेतकऱ्याने लढवली अनोखी शक्कल; नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक, VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: एक्स)
मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडूच्या थूथुकुडी जिल्ह्यातील सलाईपुथूर येथील ३५ वर्षीय शेतकरी दिनकरराज याचे कुटुंब पिढ्यानपिढ्या चाडी आणि माडीच्या झाडांपासून मिळणाऱ्या रसाचा व्यवसाय करतात. दिनकरराजचे वडील दररोज ५५ फूट उंच असलेल्या ताडीच्या झाडावर चढून रस काढायचे. या एका झाडापासून त्यांना हंगामात लाखो रुपयांचे उत्पन्न मिळायचे परंतु वडीलांचे वय वाढल्याने आणि झाडाचे खोड गुगुळीत व बुंधा मोठा झाल्यामुळे झाडावर चढणे अशक्य आणि धोकादायक बनले होते. वडीलांचा हा त्रास पाहून दिनकरराजने एक भन्नाट शक्कल लढवली.
त्याने झाडाच्या खोडाला लोखंडी पट्ट्या बांधून सुनारे २२० ते २५० किलो लोखंडाचा वापर करुन एक शिडी गोलाकार आकारात तयार केली. ४८ पायऱ्यांची ही मजबूत शिडी बांधण्यासाठी सुमारे ६०,००० रुपये खर्च आला. परंतु यामुळे दिनककरच्या वडिलांचा त्रास काहीसा कमी झाला. शिडी बसवताना झाडाला एकही खिळा ठोकण्यात आलेला नाही. लोखंडी पट्ट्याच्या सहाय्याने घट्ट पकडून बांधण्यात आलेली आहे. घरातील महिला आणि इतर मूलेही झाडावर सहजपण चढू शकतात.
The best entrepreneurs don’t just increase profits.
They solve expensive problems forever. A farmer in Salaiputhur, Tamil Nadu had a different idea. His 70-year-old father could no longer climb 55-foot palmyra trees. Instead of letting generations of work disappear… He… pic.twitter.com/kYjscozbSA — Chandana 🌻✨ (@RoseOnX9) July 8, 2026
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @RoseOnX9 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. या जुगाडाचे नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे. हा केवळ एक जुगाज नसून ग्रामीण मजुरांच्या टंचाईवर आणि सुरक्षेवर शोधलेला एक उत्तम तोडगा असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






