(फोटो सौजन्य: X)
काय आहे प्रकरण?
माहितीनुसार, सदर घटना ही बिहारच्या बरौनी-कटिहार रेल्वे मार्गावरील मानसी रेल्वे स्टेशनवर घडून आली. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात एक चोर खिडकीला लटकत त्याला सोडून देण्याची विनवणी करताना दिसतो. तो पुन्हा पुन्हा मला सोडून द्या अशी याचना करत असतो, कारण यावेळी ट्रेन सुरु झाली असते आणि खिडकीतून त्याचा हात पकडल्याने तो चालू ट्रेनसोबतच पुढे ढकलला जात असतो. मुख्य म्हणजे चोराच्या या चुकीवर प्रवासी इतके संतप्त असतात की काही त्याला कानशिलात देखील बजावतात. व्हिडिओमध्ये कथित चोर म्हणताना ऐकू येतो की, “सर, मी चोरी करत नव्हतो. माझा हात मोडेल, दादा. मी लखमनियाचा आहे. आम्ही फक्त ट्रेनमधील लोकांना पाहत होतो, मोबाईल हिसकावत नव्हतो. आम्ही अशा गोष्टी करत नाही.”
प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ९ जुलै रोजी घडली. पाटलीपुत्र ते पूर्णियाला जाणारी जनहित एक्सप्रेस रात्री सुमारे साडेबारा वाजता मानसी स्टेशनवर पोहोचली. यावेळी स्लीपर कोच गर्दीने खचाखच भरलेला होता आणि याचाच फायदा घेत चोराने खिडकीतून हात घालत फोन लंपास करण्याचा प्रयत्न केला. परंतु एका प्रवाशाने ते पाहिले आणि लगेच त्याचा हात पकडून ठेवला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर प्रवाशांनीही चोराचा हात पकडला आणि त्याला या चोरीची शिक्षा देण्याचा निर्णय घेतला.
ट्रेन की खिड़की से मोबाइल चुराते युवक को पकड़ लिया ट्रेन चलती रही युवक लटका रहा pic.twitter.com/x0gINl3clc — md shaikh (@maslahuddin182) July 11, 2026
प्रवाशांनी चोराकडे विचारणा करताच त्याने सांगितले की, तो त्याच्या एका नातेवाईकाला रेल्वेत शोधत होता. तथापि, या घटनेनंतर त्याला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, त्याने आपले नाव आणि ओळख चुकीची सांगितली. तो आपली खरी ओळख लपवण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीची ओळख मोहम्मद फखरुद्दीन उर्फ छोटू अशी पटली असून त्याच्यावर लवकरच कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






