(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मीडियावर नेहमीच अनेक अनोखे व्हिडिओज शेअर केले जातात. व्हिडिओतील हे दृश्य बऱ्याचदा आपल्या कल्पनेपलीकडचे ठरतात आणि त्यामुळेच कमी काळात ते वैराळी होतात. इथे नवनवीन स्टंट्स, जुगाड, यासहच थरारक अपघाताचे दृश्यही शेअर होते. आपला जीव धोक्यात घालून लोक अनेकदा नको ती स्टंटबाजी करतात खरं पण हीच स्टंटबाजी नेहमीच यशस्वी होईल असे नाही. यात पत्करलेला धोका आपल्या अंगाशीही येऊ शकतो. मात्र आताच्या व्हायरल व्हिडिओमध्ये अपघाताचे एक अनोकीज आणि वेगळे दृश्य दिसले ज्यात चुकी एकाने केली पण त्याची शिक्षा मात्र दुसऱ्यालाच मिळाली. चला यात नक्की काय घडलं ते जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात रस्त्यावर काही बाइक्स चालताना दिसून येत आहेत आणि यामध्येच रस्त्याच्या मधोमध एक बाईकस्वार आपल्या चालू बाईकवर उभा राहून स्टंट करताना दिसून येतो. तो चालू बाईकवर बॅलन्स करून उभा राहतो. व्यक्तीचा हा स्टंट पाहून आजूबाजूचे बाईकस्वार देखील घाबरतात. व्यक्ती बाईकवर उभा राहून पोज देतच असतो की तितक्यात त्याचा तोल ढासळतो आणि तो खाली पडू लागतो. पण भावाचं नशीब इतकं भारी की तो रस्त्यावर पडण्याआधीच स्वतःला सावरतो आणि बाईकवर नियंत्रण मिळवत बाईक रस्त्याच्या कडेला घेऊन जातो. रस्त्यावर सुरु असलेल्या या गोंधळात मागून चालणाऱ्या बाईकस्वराचे मात्र भान हरपते आणि त्याची बाईक रस्त्यावरच उलटी पडते. बाईकसहच बाईकस्वार आणि मागे बसलेली व्यक्ती असे दोघेही रस्त्यावर पडतात आणि यातून आपल्याला ‘करे कोई, भरे कोई’ वाला सीन पाहायला मिळतो. स्टंटबाजीचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून लोक आता बाईकस्वाराच्या स्टंटबाजीवर आपला संताप व्यक्त करत आहेत.
दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ @viral_india.official नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला असून व्हिडिओ सध्या चांगलाच शेअर केला जात आहे. व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करत व्यक्तीच्या स्टंटबाजीवर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त करत आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जेव्हा पाप कुणी एक करतं आणि त्याचं फळ कुण्या दुसऱ्याला मिळतं” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “चुकीच्या लोकांना फॉलो करणं व्यक्तीला चांगलंच महागात पडल्याचं दिसतंय”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.