(फोटो सौजन्य: X)
जगात आई-वडिलांसारख निस्वार्थी प्रेम आपल्यावर कुणीही करु शकत नाही. आपलं मुलं धोक्यात आहे हे जाणवताच पालक एका ढालीप्रमाणे त्या संकटावर मात करतात आणि मुलाला संकटातून बाहेर काढतात. आता आई-वडिलांचे हे प्रेम फक्त माणसांपुरतेच मर्यादित नसून प्राण्यांमध्येही ही माया तेवढीच दिसून येते. नुकताच एका हत्तीच्या कुटुंबाचा व्हिडिओ इंटरनेटवर शेअर करण्यात आला आहे ज्यात हत्तीचे पिल्लू एका संकटात अडकल्याचे दिसून येते. आपला मुलगा अडचणीत आहे हे समजताच हत्तीचे आई-वडिल लगेच मदतीसाठी धाव घेतात आणि जुगाड करत त्याला या अडचणीतून बाहेर काढतात. हत्तीच्या कुटुंबाचा हा गोंडस व्हिडिओ आता सर्वांची मने जिंकत आहे. चला यात काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, दोन हत्ती जंगलाच्या पलीकडे रस्ता ओलांडताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत एक हत्तीचे बाळ देखील आहे. वाटेत मध्यभागी एक उतार आहे, जो बाळ हत्तीला ओलांडणे कठीण आहे. अशा परिस्थितीत, त्याचे आई-वडिल मदतीसाठी धावतात आणि त्याला वर चढण्यास मदत करतात. मूल छोटी पावले टाकून सर्वोत्तम प्रयत्न करते, परंतु वारंवार पडतो. त्यानंतर आई तिच्या सोंडेने आणि हलक्या पायांनी मुलाला वर ढकलण्याचा प्रयत्न करते.जवळच उभे असलेले त्याचे वडिल जेव्हा हे पाहतात तेव्हा तेही त्याच्या सोंडेने हत्तीच्या बाळाला वर खेचण्याचा प्रयत्न करतात, ज्यानंतर तो वर चढतो. कुटुंबाच्या साथीने अडचणीवर सहज मात केली जाऊ शकते आणि हेच व्हिडिओमध्ये दिसून आले.
That mother calf duo. Nobody should leave behind. pic.twitter.com/uX7Uo1FnLX — Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) October 16, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @ParveenKaswany नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तिथे इतक्या लोकांचा जमाव का उभा आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “लहान हत्ती क्यूट दिसतात” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आजूबाजूला माणसांना घाबरणाऱ्या हत्तींमध्ये चिंता स्पष्टपणे दिसून येते. आशा आहे की ते सुरक्षित असतील”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.