(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मीडियावर आपण नेहमीच काही ना काही व्हायरल होताना बघत असतो. इथे कधी स्टंट्स शेअर केले जातात कधी अपघात तर काही हास्यापद दृश्य. आता मात्र इथे एक अनोखे आणि सुंदर दृश्य व्हायरल झाले आहे ज्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक शहामृग आपले कंबर डोलवत केरळच्या रस्त्यावर चालताना दिसून आले आहे. आपण अनेक प्राणी रस्त्यावर फिरताना पाहतो मात्र असे दुर्मिळ प्राणी जे अधिकतर शहरांमध्ये दिसून येत नाही त्यांना अचानक असे पाहताच लोकांचे लक्ष त्याकडे खिळून राहते. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
केरळमधील कोचीजवळील एडाथला परिसरातील रस्त्यावर एक मोठा शहामृग फिरताना दिसला. शहामृगाला असे फिरताना पाहून लोक आश्चर्यचकित झाले. ज्यानंतर लोकांनी हे दृश्य आपल्या फोनच्या कॅमेरात कैद करून त्याला सोशल मीडियावर शेअर केले. आफ्रिकन पक्षी भारताच्या रस्त्यावर चालताना पाहून सर्वांचे डोळे भारावले आणि लोक हे दृश्य आपल्या डोळ्यात साठवून ठेवू लागले. आजवर आपण या पक्ष्याला दूरदर्शन अथवा फोटोमध्ये पाहिले आहे मात्र पहिल्यांदाच त्याचे असे प्रत्यक्षात दर्शन घेऊन लोक थक्क झाली. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा एक दुर्मिळ प्राणी आहे जो अधिकतर बाहेर देशात आढळून येतो.
स्थानिक अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे की, हा शहामृग एका खाजगी व्यक्तीचा पाळीव प्राणी होता जो चुकून त्याच्या कुंपणातून बाहेर पडून रस्त्यावर आला होता. त्यानंतर काही वेळातच ते त्याच्या मालकाकडे सुरक्षितपणे परत करण्यात आले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून लोक आता व्हिडिओवर कमेंट्स करत यावर आपल्या निरनिराळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. एका युजरने लिहले आहे, “त्याने त्याचे सर्व पंख गमावले आहेत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आशा आहे की संबंधित विभागाने त्याला वाचवले असेल”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.