(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मीडिया सध्या जगभर प्रसिद्ध आहे. इथे लाखो युजर्स जोडले गेले असून दररोज अनेक मनोरंजक आणि रोमांचक व्हिडिओज इंटरनेटवर शेअर केले जातात. हे इथे कधी काय दिसून येईल याचा नेम नाही. तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल तर अनेक थरारक आणि आश्चर्यकारक व्हिडिओज तुम्ही इथे पाहिले असतील. हे व्हिडिओ कधी आपल्याला हसवतात तर कधी थक्क करून जातात. आता मात्र इथे एक असा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्याने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. व्हिडिओमध्ये एक सुंदर तरुणी कोणा माणसाला नाही तर चक्क सापाला आपल्या जवळ घेऊन त्याला किस करताना दिसून आली. सापासारखा विषारी प्राणी ज्याला पाहूनच लोक पळू लागतात अशा धोकादायक प्राण्याला किस करताना पाहून युजर्स अवाक् झाले आणि वेगाने हा व्हिडिओ शेअर करू लागले. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये घडलेली ही घटना काल्पनिक आणि खोटी वाटतं असली तरी ती सत्यात घडून आली आहे. वास्तविक, तरुणीने सापाचे चुंबन घेतले असून हे दृश्य पाहणे म्हणजे अंगावर काटा आणण्यासारखे आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात एक सुंदर तरुणी दिसून येत आहे. तिने गळ्यात मोत्यांची माळ घातलेली असते. यावेळी तिने आपल्या हातात एक साप पकडल्याचेही दिसून येते. ती सापाला हातात पकडत आपले हात वर झेपावते आणि हळुहळू सापाचे तोंड तिच्याजवळ घेऊन येते. इथपर्यंत सर्वकाही ठीक असतं पण तितक्यात तरुणी असं काही करते की पाहणाऱ्यांचे डोळे विस्फारून जातात. पुढच्याच क्षणी तरुणी सापाला जवळ घेत आपल्या ओठांनी त्याचे चुंबन घेते आणि क्षणातच संपूर्ण चित्र बदलून जाते. सापही एकटक तरुणीकडे बघत राहतो, जे पाहून असं वाटतं की त्यालाही आश्चर्याचा धक्का मिळाला असावा.
आम्ही तुम्हाला सांगतो की, ही तरुणी सापप्रेमी आहे ज्यामुळे तिला सापाचे भय नाही. तिच्या इंस्टाग्राम हँडलवर याआधीही सापासोबतचे अनेक व्हिडिओज शेअर करण्यात आले आहेत आणि अशातच सापाला किस केल्याचा हा तिचा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. हा व्हिडिओ @lauraisabelaleon इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “माझ्या एक्स गर्लफ्रेंडने दुसऱ्या मुलीला किस केल्याचा व्हिडिओ कुणी पोस्ट केला” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कोणत्या जातीचा साप जास्त विषारी आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “किस करायला माणसं भेटली नाहीत का?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.