फिलिपिन्सच्या ताल ज्वालामुखीचा भयंकर उद्रेक; राख अन् वाफेचा प्रचंड लोट, थरारक घटना कॅमेरात कैद, VIDEO (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
फिलिपिन्सच्या बटांगास प्रांतातील ताल ज्वालामुखी हा जगातील सर्वात सक्रिय आणि धोकादायक ज्वालामुखींपैकी एख मानला जातो. या ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या राख आणि वाफेच्या ढगांमुळे पसिरताली नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. फिलिपिन्सच्या ज्वालामुखी आणि भूकंप निरीक्षण संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ज्वालामुखीतून किरकोळ फ्रियाटोमॅग्मॅटिक उद्रेक झाल. दुसऱ्या उद्रेकात राख आणि वाफेचे ढग उडाले. हा उद्रेक काही मिनिटंचे सुरु होता. पण हे दृश्य अत्यंत थरकाप उडवणारे होते.
सध्या याचा मोठा स्फोट होण्याचा धोका नाही. परंतु अचानक वाफेचे ढग किंवा राखेचे छोटे छोटे उद्रेक होऊन शकतात. या ज्वालामुखीच्या जवळ गाड लोकवस्ती असल्याने मोठे उद्रेक झाल्यास नागरिकांच्या जीवाला धोका वाढू शकतो. यामुळे सरकारने ज्वालामुखीच्या परसिरात जाण्यास पर्यटकांना व नागरिकांना सक्त मनाई केली आहे. तसेच ज्वालामुखीच्या हलाचालींवर २४ तास लक्ष ठेवले जात आहे.
या उद्रेकात कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून गरज पडल्या अलर्ट जारी केला जाणार असे सरकारने स्पष्ट केले आहे. २०२० मध्ये या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलण्यात आले होते.
Taal Volcano in the Philippines produced phreatomagmatic eruptions on June 30, 2026, sending ash-and-steam plumes 1,200 meters above the main crater, per PHIVOLCS. pic.twitter.com/gGq8mG1RXc — Open Source Intel (@Osint613) July 1, 2026
VIRAL : असा कसा श्रीमंतीचा थाट! खासदाराच्या घरात चक्क सापडली सोन्याची ब्रा अन् रत्नजडित बिकनी?






