आग्राच्या शाळेत मुख्याध्यापक आणि शिक्षकेमध्ये झालेल्या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये मुख्याध्यापिकेने महिला शिक्षिकेला मारहाण करताना दिसता आहे.
सोशल मीडियवर नेहमी अतरंगी व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी काही व्हिडिओ विनोदी असतात. आता सध्या शाळेतील मुख्यधापिका आणि शिक्षक यांचा एका व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील एका शाळेतील मुख्याध्यापिका आणि शिक्षक यांच्यातील वादाचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये मुख्याध्यापिका शिक्षकाला मारहाण (Principal slaps teacher) करताना दिसत आहे. मुख्याध्यापिकेने शिक्षिकेला चापट मारली आणि शिवीगाळही केली. व्हिडिओमध्ये इतर शिक्षकही उपस्थित होते जे वाद शांत करण्याचा प्रयत्न करत होते, तरीही मुख्यधापिका तिला मारण्याचा प्रयत्न करतच होती.
[read_also content=”गुरुचरण सिंगचा अद्याप पत्ता नाही, आता दिल्ली पोलीस तारक मेहता शोमधील कलाकारांची करणार चौकशी!
आग्रा येथील सरकारी शाळेतील हा प्रकार असल्याचं सांगण्यात येत आहे. शाळेत उशिरा पोहोचल्याने मुख्याध्यापिका संतापल्या. आधी तिने शिक्षिकेला शिवीगाळ केली आणि नंतर तिच्या मारण्यास सुरुवात केली. मुख्याध्यापिकेचा अचानक झालेला संताप शिक्षकांनाही समजू शकला नाही. मुख्याध्यापिकेने शिक्षिकेचा हात मुरडून तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी इतर शिक्षक व कर्मचाऱ्यांनीही तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने वारंवार शिक्षिकेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
शाळेत घडलेल्या या प्रकरणाने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. या भांडणात दोघांमध्ये हाणामारी आणि शाब्दिक युद्ध झाले. दोघांनीही एकमेकांवर अनेक आरोप केले. दोघींमधील या भांडणाचा सध्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मारहाणीत शिक्षक जखमी झाल्याचा दावा
मुख्याध्यापिका आणि शिक्षक यांच्यातील भांडणाच्या व्हिडिओमध्ये शिक्षका जखमी झाल्याचा दावा केला जात आहे. आता या प्रकरणी काय कारवाई होते याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे.
Web Title: Principle slap teacher for reaching late in school in agra nrps