विवाह म्हणजे अनेकांसाठी दोन जिवांचे मिलन, सुखी जीवनाची सुरुवात वैगेरे गोष्टी असतात. अनेकांना आपल्या लग्नाचे फोटोशुट, व्हिडिओशुटही करायला आवडते. असे अनेक व्हिडिओ पुढे व्हायरल होता. ज्यात नवरीचे रुप पाहून नवरा मुलगा चक्क रडायलाच सुरुवात करतो. त्याचे रडणे पाहून अनेकांना प्रश्न पडतो आहे की, हा असा का रडायला लागला आहे.
सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेला या व्हिडिओत पाहायला मिळते की, नवरा मुलगा रडायला लागताच त्याचे नातेवाईक जवळ जमा होता. त्यातले कोणी त्याच्या पाठीवरुन हात फिरवते. कोणी त्याला चांगले समजावू लागते. हे त्या वेळी घडते जेव्हा नवरी मुलगी बोहल्याजवळ येते. नवरी मुलगीही नवऱ्या मुलाला पाहून खूश होते. तिच्या डोळ्यातूनही प्रेम झिरपू लागते. ती प्रेमाने नवरदेवाला पाहातच राहते.