सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. यातील अनेक व्हिडिओ आपले मनोरंजन देखील करत असतात. मात्र सध्या जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो व्हिडिओ पाहून तुम्ही हैराण व्हाल. हा व्हिडिओ पाहून आता नेटकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. व्हिडिओत एक निर्दयी शिक्षक आपल्या चिमुकल्या विद्यार्थ्याला क्रूरतेने भिंतीवर आपटत मारताना दिसत आहे.
अहमदाबादमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका शाळेतील शिक्षकाने एका वर्गातील मुलाला अशा प्रकारे मारहाण केली की एखाद्या कसाईलाही लाज वाटेल. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. खरं तर, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये व्यवसायाने खाजगी शिक्षक असलेल्या एका व्यक्तीने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.
हेदेखील वाचा – Viral Video: पुण्यात रात्रीच्या सुमारास कार चालकासोबत घडलं असं काही… पाहूनच अचंबित व्हाल
व्हिडिओत दिसते की, शिक्षक मुलाला बेंचवरून त्याच्या केसांनी उचलतात आणि नंतर त्याला वर्गात त्याच्या खुर्चीवर ओढतात. या दरम्यान, मुलगा शिक्षकापासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो परंतु शिक्षक त्याला पकडतात आणि जनावराप्रमाणे दूर घेऊन जातात. यानंतर, शिक्षकाने मुलाची मान धरली आणि त्याचे डोके भिंतीवर आपटले, मूल त्यातून बाहेर येण्याआधी, शिक्षकाने एकामागून एक 11 वेळा त्याच्या गालावर चापट मारली.
ही सर्व घटना वर्गात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आणि याचाच व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अहमदाबादच्या जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी दोन खासगी शाळांना नोटीस पाठवून त्यांचे उत्तर मागितले आहे. हा व्हिडिओ कथितरित्या माधव पब्लिक स्कूलचा आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर शाळेचे ट्रस्टी सचिन प्रजापती यांनी शाळेच्या मुख्याध्यापकाला निलंबित केले आहे.
अहमदाबाद की एक प्राईवेट स्कूल का सीसीटीवी वायरल हो रहा हे।
इस टीचर के लिए क्या सजा होनी चाहिए – pic.twitter.com/bYGWya0Ma3— Gopi Maniar ghanghar (@gopimaniar) October 1, 2024
हेदेखील वाचा – बिबट्याने जबड्यात माकडिणीला पकडलं तरीही मृत आईला बिलगून राहिलं पिल्लू, हृदय पिळवटून टाकणारा Video Viral
दरम्यान या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ @gopimaniar नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, अहमदाबादमधील एका खासगी शाळेचा सीसीटीव्ही व्हायरल होत आहे. या शिक्षकाला काय शिक्षा व्हावी? असा प्रश्न विचारण्यात आला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट्स करत या घटनेवर आपले मत मांडले आहे. एका युजरने लिहिले आहे, “किती क्रूर होता हा शिक्षक” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “यावर कारवाई व्हायला हवी”.