(फोटो सौजन्य: Twitter)
सोशल मीडियावर पुन्हा एकदा प्राण्यांमधील एका थरारक लढतीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, मात्र लढतीचे हे दृश्ये जरासे नवे आणि अनोखे आहेत. तुम्ही आजवर अनेक प्राण्यांमध्ये झालेले युद्ध सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिले असतील मात्र तुम्ही कधी दोन अस्वलांमधील युद्ध पाहिले आहे का? मुळातच अस्वल हा प्राणी फार कमी ठिकाणी पाहायला मिळतो. आपल्या विशालकाय शरीरामुळे तो लोकांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करतो. दोन अस्वलांमधील ही लढत आता अनेकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन तपकिरी अस्वल एकमेकांशी जोरदार भांडताना दिसत आहेत. सहसा एकटे राहायला आवडणारे हे अस्वल काही कारणावरून एकमेकांशी भिडल्याचे व्हिडिओत दिसत आहे. कोणत्या तरी कारणावरून सुरु झालेले हे युद्ध फार भयानक वळण घेते आणि दोन्ही अस्वल एकमेकांच्या जीवावर उठतात, ही दृश्ये दृश्य अनेकांना हैराण करून टाकणारी आहेत.
कसा जायचा संभाजी महाराजांचा दिवस? AI ने तयार केला अनोखा व्हिडिओ; दृश्ये पाहून सुखद धक्काच मिळेल
काय आहे व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये दोन अस्वल एकमेकांकडे गुरगुरताना, मागच्या पायावर उभे राहून वेगाने हल्ला करताना दिसत आहेत. ही लढत इतकी जबरदस्त असते की दोघांपैकी एकही यात मागे हटण्याचे नाव घेत नाही. अस्वलांची अफाट शक्ती आणि राग व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येतो. हे पाहून असे वाटते जणू त्यांना त्यांचे वर्चस्व सिद्ध करायचे आहे. जंगलातील हे रोमांचक युद्ध पाहून आता युजर्स थक्क झाले आहेत. असे दृश्य सहसा फक्त चित्रपटांमध्येच पाहिले जाते, परंतु हे वास्तविक युद्ध लोकांना व्हिडिओवर चिकटवून ठेवते. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना केवळ आश्चर्यच वाटले नाही तर निसर्गाची शक्ती जवळून समजून घेता आली. अस्वलांमधली ही झुंज जंगलात जगण्यासाठी किती संघर्ष करत आहे हे दाखवते. एएकंदरीत, हा व्हिडिओ भय, आश्चर्य आणि मजा यांचे संपूर्ण पॅकेज आहे, जो लोकांना तो पुन्हा पुन्हा पाहण्यास भाग पाडतो.
Wild fight between two huge brown bears in 4K
Brown bears, usually solitary by nature, are driven to fight each other mainly due to competition for resources, particularly during periods of scarcity.pic.twitter.com/KD5wC6tgvK
— Massimo (@Rainmaker1973) December 5, 2024
अस्वलांच्या लढतीचा हा व्हिडिओ @Rainmaker1973 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘4K मध्ये दोन प्रचंड तपकिरी अस्वलांमधील जंगली लढाई, तपकिरी अस्वल, जे सहसा स्वभावाने एकटे असतात, ते प्रामुख्याने संसाधनांसाठीच्या स्पर्धेमुळे, विशेषतः टंचाईच्या काळात एकमेकांशी लढण्यास प्रवृत्त होतात’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “कारण अस्वल कधीच लढत नाहीत… ते संसाधनांच्या कमतरतेमुळे असावे ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पहिला लढाई सुरू होण्यापूर्वीच जखमी दिसत होता. तो लंगडत होता”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.