(फोटो सौजन्य: Instagram)
संभाजी महाराज्यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ चित्रपट मागेच रिलीज झाला, जो संपूर्ण देशभर धुमाकूळ घालत आहे. यात अभिनेत्या विकी कौशलने संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. लोकांना हा चित्रपट इतका आवडला की अजूनही तो पाहण्यासाठी थिएटर्समध्ये लोकांची भरमसाट गर्दी दिसून येते. स्वराज्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. चित्रपट पाहताना अनेकांच्या अंगावर काटा आणणारे क्षण दाखवण्यात आले. आपण काळात जाऊ शकत नसलो तरी यासंबंधीचा एक व्हिडिओ आता एआयद्वारे तयार करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून यातील दृश्ये तुम्हाला सुखद धक्का देऊन जातील.
आपल्या कल्पनेच्या जोरावर AI ने आता संभाजी महारांच्या दिवसाची एक झलक दाखवली आहे जी आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातील दृश्ये पाहून आता सर्वजण दंग झाले आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात, संभाजी महाराजांचे मुखदर्शन तर घडवण्यात आले नाही मात्र त्यांचा दिवस आणि मावळ्यांसोबतचे, आपल्या प्रजेसोबतचे त्यांचे नाते स्पष्टपणे दाखवण्यात आले आहे. यात त्यांच्या दिवसाची सुरुवात नाश्त्याने होताना दिसते. यानंतर प्रजेशी वार्तालाप आणि मग युद्धाचे नियोजन तसेच पुढे ते मावळ्यांसोबत न्याहारी करतानाही दिसून येतात. दिवसाच्या शेवटी मात्र आपल्या किल्ल्यावरून ते आपल्या राज्याकडे पाहताना दिसून येतात.
हे संपूर्णच दृश्ये फार अनोखे असून संभाजी महाराजांच्या इतिहासाला पुन्हा जिवंत करणारे आहेत. लोक हे दृश्ये पाहून फार सुखावले असून वेगाने आता हा व्हिडिओ शेअर केला जात आहे. हा व्हायरल व्हिडिओ @sushantchavan7 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला असून लाखो लोकांनी आतापर्यंत हा व्हिडिओ पाहिला आहे. तसेच अनेकांनी व्हिडिओवर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “इतके आरामदायी जीवन संभाजी महाराजांच्या कुठे नशिबात होती” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “नाही रे दादा आपली तेवढी लायकी नाहीं,ते स्वराज्याचे आराध्य दैवत आहेत..” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “असा राजा पुन्हा होणे नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.