(फोटो सौजन्य: Twitter)
आग्रा येथील नौबारी प्राथमिक शाळेतून धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे जो आता वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात सरकारी महिला शिक्षक शाळेच्या आत आपापसात जोरदार भांडताना आणि एकमेकांना मारताना दिसल्या. एका तरुणाने या घटनेचा व्हिडिओ आपल्या फोनच्या कॅमेरात रेकॉर्ड केला आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. शिक्षणाचे मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाळेत महिला शिक्षिका एकमेकांना काठीने मारहाण करत असल्याचे पाहून सर्वच थक्क झाले.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये काही महिला शिक्षकांमध्ये तुंबळ हाणामारी होत असल्याचे दिसत आहे. ही घटना आग्रातील एका प्राथमिक शाळेत घडून आली. यात तुम्ही पाहू शकता की, दोन्ही महिला शिक्षिका अक्षरशः लाठ्यांनी एकमेकांना हाणत आहेत आणि आपसात भांडत आहेत. हा व्हिडिओ शाळेच्या आवारातून समोर आला आहे, जिथे मुले देखील उपस्थित होती. पण तोपर्यंत तेथील अभ्यासाचे वातावरण पूर्णपणे बिघडले होते. व्हिडिओमध्ये हे देखील दिसून येते की एक तरुण ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड करत आहे, तर इतर लोक महिला शिक्षकांना वेगळे करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी होतो आणि शिक्षिका आपले मारण्याचे काम सुरूच ठेवतात.
शाळा हे शिक्षणाचे मंदिर मानले जाते, पण ही घटना त्या कल्पनेला आव्हान देते. एकीकडे मुलांचे शिक्षण आणि संस्कारांची जबाबदारी शाळांवर असताना काही महिला शिक्षिका आपापसात कसे भांडत आहेत हे या घटनेने दाखवून दिले. अशा घटनांमुळे शिक्षणाचे वातावरण नष्ट होऊन समाजात चुकीचा संदेश जातो. महिला शिक्षकांमध्ये हा वाद कशामुळे झाला हे सध्या तरी स्पष्ट झालेले नाही. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणाची चौकशी केली जात असून, या घटनेच्या वेळी शाळेमध्ये काय परिस्थिती होती हे देखील शोधले जाईल. महिला शिक्षकांमध्ये काय वाद झाला आणि या वादामुळे शैक्षणिक वातावरणावर परिणाम झाला का, हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
आगरा में पढ़े लिखे लोगों का यह हाल है
सरकारी स्कूल बना मारपीट का अखाड़ा,जमकर टीचरों में चले डंडे
नौबरी प्राथमिक विद्यालय से हैरान करने वाली तस्वीरें आई सामने
विद्यालय के अंदर सरकारी महिला टीचर आपस में लड़ती नजर आई
आगरा का ये वीडियो सोशल मीडिया पर जमकर हो रहा वायरल pic.twitter.com/RgEjntKqSz
— जनाब खान क्राइम रिपोर्टर (@janabkhan08) March 7, 2025
शिक्षकांमधील हाणामारीचा हा व्हिडिओ @janabkhan08 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीची माहिती देण्यात आली आहे. व्हिडिओला आतापर्यंत अनेकांनी पाहिले असून हा व्हिडिओ आता वेगाने सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.