थार चालकाच अमानवी कृत्य! वृद्ध व्यक्तीच्या अंगावर गाडी घातली अन्...; व्हिडिओ पाहून उडेल थरकाप
अलीकडे आपण आधुनिक युगाकडे पळत आहोत. मात्र आधुनिकतेच्या मागे पळता पळता माणूस स्वत:मधील माणूसकी विसरत चालला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हे स्पष्ट देखील होईल की, कशीप्रकारने मानव एकमेकांचे शत्रू होत आहे. सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका कार चालकाने वृद्ध व्यक्तीसोबत असे काही केले आहे की, व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. ही घटना जम्मू मध्ये घडली असल्याचा दावा व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये करण्यात आला आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @divya_gandotra या अकाउंटवरील व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एका थार चालकाने एक वृद्ध व्यक्तीला उडवले आहे. धक्कादायक बाब म्हणजे थार चालका एवढ्यावरच थांबलेला नाही, नागी पुन्हा दोन वेळा आजोबांना कारने उडवले आहे. व्हायरल होच असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक वृद्ध व्यक्ती स्कूटीवरुन जात आहे. याच वेळी मागून एक थार येत असते. थारचा चालक वृद्ध व्यक्तीला जोरात धडक देतो. यामुळे वृद्ध व्यक्ती स्कूटीसह खाली पडतो. त्यानंतर वृद्ध व्यक्ती उठण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र तोपर्यंत थार चालक पुन्हा येऊन त्याच्या अंगावर गाडी घलतो. त्यानंतर गाडीतून उतरून त्या वृद्ध व्यक्तीजवळ जातो. गोल फिरतो आणि पुन्हा आपली गाडी घेभन तिथून फरार होता.
व्हायरल व्हिडिओ
ये सब अब Jammu में भी शुरू हो गया है…
Thar वाला जानबूझकर बुजुर्ग को टक्कर मारता है, न अफ़सोस, न इंसानियत।
इतनी बेरहमी? CCTV में सब साफ़ दिख रहा है @JmuKmrPolice— Divya Gandotra Tandon (@divya_gandotra) July 28, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
ही घटना जम्मूमध्ये घडली असून यावर नेटकऱ्यांकडून कारवाईची मागणी केली जात आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. एका युजरने या घटनेवर कारवाई झाली का नाही असा प्रश्न केला आहे, तर दुसऱ्या एका युजरने तिथे आसपासच्या लोकांनी त्या आरोपीला का पकडले नाही असा प्रश्न केला आहे. सध्या अनेकजण यावर तीव्र प्रतिक्रिया देत आहेत.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.