क्षणात झालं होत्याचं नव्हतं! हेल्मेट घातलं असतं तर वाचला असता जीव; अंगावर काटा आणणारा अपघाताचा VIDEO VIRAL
सोशल मीडियावर अलीकडे अनेक अपघातांचे भायवह व्हिडिओ पाहायला मिळत आहे. अलीकडे अपघातांचे प्रमाणा वाढले असून अनेकदा हे अपघात लोकांच्या निष्काळजीपणामुळे घडतात. अनेकदा लोक वाहतूकीच्या नियमांकडे, स्वत:च्या सुरक्षेकडे दुलर्क्ष करतात आणि आपला जीव गमावून बसतात. कधी वेगाने गाडी चालवल्याने अपघाता होतो, तर कधी हेल्मेट न घातल्यामुळे लोक अपघाताला बळी पडतात. सध्या अशाच एका उदाहरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
एका व्यक्तीला हेल्मेट न घातल्यामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या या भयावह अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एका व्यक्तीचे डोके बसच्या चाकाखाली आले आहे. यामुळे नक्कीच त्याला गंभीर दुखापत झाली असणार किंवा त्याचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती स्कूटीवरुन जाताना दिसत आहे. याच वेळी मागू एक बस येत आहे. अचानक बसची धडक स्कूटीस्वाराला बसते. स्कूटीस्वार गाडीवरुन खाली पडतो आणि बस त्याच्या डोक्यावरुन जाते. त्यानंतर ती व्यक्ती उठत नाही. यावेळी आसपास असलेले भाजी विक्रेते व्यक्तीच्या मदतीसाठी धावतात. हा व्हिडिओ इथेच संपल्याने पुढे त्या व्यक्तीचे नक्की काय झाले याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. परंतु हेल्मेट न घालणे हे कितपत धोकादायक ठरू शकते याचे उदाहरण हा व्हिडिओ आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @reels_edits_dp या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला सध्या हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर स्कूटीचालका बद्दल विचारपूरस केली आहे. लोकांनी त्याचा जीव वाचला का, त्याला उपचार मिळाले का असे प्रश्न उपस्थित केले आहेत. तर अनेकांनी बस वाल्याला चूकीचे धरले आहे, तर काहींनी स्कूटीचालकाची चूक असल्याचे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






