(फोटो सौजन्य: Instagram)
हत्ती हे प्राणी शरीराने विशालकाय असले तरी त्यांचे मन मात्र फार साफ आणि प्रेमळ असते. हेच कारण आहे की, आपले इतके मोठे रुप असूनही ते नेहमीच माणसांमध्ये रमणीय राहतात. लोकांच्या मनात हत्तीसाठी फक्त प्रेमळ भावनाच नाही तर एक आध्यात्मिक आदराचीही भावना आहे. भगवान गणेशाचे मुख हे हत्तीचे असल्याकारणाने भारतात हत्तींना विशेष मान दिला जातो आणि हेच कारण आहे की, रस्त्याने कधी लोकांना हत्ती दिसला की लोक लगेच त्याला वंदन करतात. सध्याच्या व्हायरल व्हिडिओमध्येही एका चिमुकलीसोबत एक असाच प्रकार घडून आला. चला यात नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात दिसते की, एक हत्ती आपल्या मालतासोबत रस्त्याने जात होता. हत्तीला पाहताच बाजूला उभी असलेली चिमुकली त्याला पाहत राहते. काहीवेळाने ती त्याच्या दिशेने चालू लागते तिला पाहताच हत्ती आपल्या सोंड तिच्या दिशेला वळवून तिला लांबूनच आशिर्वाद देतो. यानंतर चिमुकली हत्तीच्या आणखीन जवळ जाते आणि त्याला आदराने नमन करते जे पाहून हत्ती तिच्या डोक्यावर आपली सोंड ठेवून तिला आशिर्वाद देऊ पाहतो. हे दृश्य चिमुकलीची श्रद्धा आणि हत्तीची निरागसता दाखवून देते. दोन निरागस मनाचे लोक एकत्र येतात तेव्हा हे दृश्य आणखीनच गोंडस आणि आकर्षक बनते. लोकांना हा व्हिडिओ चांगलाच आवडला असून याला सोशल मिडियावर वेगाने शेअर केले जात आहे.
खारुताई आणि सापाची फाईट कधी पाहिली आहे का? एकमेकांविरुद्ध भिडले अन् मग जे घडलं… मजेदार Video Viral
हा व्हायरल व्हिडिओ @comedyculture.in नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “व्वा…. किती सुंदर दृश्य आहे!” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “सनातन धर्माचे सौंदर्य जिथे देव प्रत्येक जीवात राहतो” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “बाप्पाचा थेट आशीर्वाद…!”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.