नोएडामध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका हायराईज सोसायटीमधून एका घरगुती मदतनीस महिलेला मालकिणीकडून मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. लिफ्टमध्ये ही घटना घडली असून, तिथे बसवलेल्या कॅमेऱ्यात ती कैद झाली आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक महिला घरात काम करणाऱ्या मदतनीसासोबत भांडत आहे व तिला मारत आहे. आता या पिडीत महिला मदतनीसाच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिचे मेडिकल करून आरोपी मालकिणीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
मिळालेल्या माहितीनुसार, शेफाली कौल नावाची महिला या सोसायटीत राहते. तिने 24 तासांच्या करारावर अनिता या 20 वर्षीय मुलीला घरगुती कामासाठी ठेवले होते. परंतु शेफाली सतत अनिताशी भांडत असे. ती अनिताला रात्रंदिवस घरची कामे करायला लावत असे, यासह ती तिला मारहाणही करत असे.
Elevator CCTV captures what a resident of Noida’s upscale Cleo County society did to her domestic help, reportedly to force her to work. FIR registered. Full story on @IndiaToday pic.twitter.com/SeyNKkyDtT
— Shiv Aroor (@ShivAroor) December 27, 2022