(फोटो सौजन्य: Gordon's Window Decor)
अद्भुत! मातीच्या पणतीवर बनवली ‘होलिका दहन कँडल’, अनोख्या जुगाडाने वेधले लोकांचं लक्ष; Video Viral
इतकेच नाही, तर रात्री दिवे लागल्यावर घरातील लोक काय करत आहेत, त्यांचा सोफा कसा आहे, ते जेवणात काय खात आहेत, हे बाहेरून स्पष्ट दिसते. सोशल मीडियावर या ‘नो कर्टन कल्चर’ची सध्या मोठी चर्चा रंगली आहे. नेदरलँड्मधील लोक आपली खाजगी जिंदगी जगाला दाखवू इच्छितात असे नाही, तर यामागे काही खास ऐतिहासिक, धार्मिक आणि व्यावहारिक कारणे आहेत. या परंपरेमागे ‘कॅल्विनवाद’ ही जुनी धार्मिक विचारधारा असल्याचे मानले जाते. या विचारधारेनुसार, जर तुम्ही प्रामाणिक आणि चांगले जीवन जगत असाल, तर तुमच्याकडे लपवण्यासारखे काहीही नसावे. उघड्या खिडक्या हे पारदर्शकतेचे आणि नैतिकतेचे प्रतीक मानले जातात. ‘माझ्या घरात काहीही चुकीचे घडत नाहीये,’ हे दाखवण्याचा हा एक मार्ग आहे.
नेदरलँडमध्ये हवामान अनेकदा ढगाळ असते आणि हिवाळ्यात सूर्यप्रकाश खूप कमी मिळतो. येथील घरे अरुंद पण खिडक्या मोठ्या असतात. नैसर्गिक प्रकाश जास्तीत जास्त घरात यावा आणि घर मोकळे वाटावे, यासाठी लोक पडदे लावणे टाळतात. पडदे लावल्यास घरात अंधार आणि कोंदटपणा जाणवतो, असे तिथल्या लोकांचे मत आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जेव्हा नेदरलँडवर जर्मन सैन्याचा ताबा होता, तेव्हा रात्रीच्या वेळी ‘ब्लॅकआउट’चे कडक नियम होते. खिडक्या पूर्णपणे झाकून ठेवाव्या लागत होत्या. युद्ध संपल्यानंतर आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, लोकांनी स्वातंत्र्याचा आनंद साजरा करण्यासाठी पडदे कायमचे बाजूला सारले. हा अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा एक सामाजिक बदल होता. उघड्या खिडक्यांचा अर्थ असा नाही की तुम्ही तिथे उभे राहून कोणाच्या घरात डोकावून पाहावे. नेदरलँड्मध्ये कोणाच्या घरात टक लावून पाहणे अत्यंत असभ्य मानले जाते.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






