स्मार्टफोन ग्राहकांना धक्का! 1 मार्चपासून महागणार Vivo आणि iQOO चे फोन? लीकमध्ये समोर आली माहिती
Vivo T4 ची किंमत भारतात 8GB + 128GB व्हेरिअंटसाठी 22,999 रुपये, 8GB + 256GB व्हेरिअंटसाठी 24,999 रुपये आणि 12GB + 256GB व्हेरिअंटसाठी 26,999 रुपये आहे. मात्र टिपस्टरने दिलेल्या माहितीनुसार, आता या व्हेरिअंटची किंमत अनुक्रमे 24,999 रुपये, 26,999 रुपये आणि 28,999 रुपये होऊ शकते. याचा अर्थ असा आहे की, व्हेरिअंटची किंमत 2000 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Vivo T4R ची किंमत भारतात 8GB + 128GB व्हेरिअंटसाठी 20,999 रुपये, 8GB + 256GB व्हेरिअंटसाठी 22,999 रुपये आणि 12GB + 256GB व्हेरिअंटसाठी 24,999 रुपये होती. मात्र आता या व्हेरिअंटची किंमत देखील वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या स्मार्टफोनच्या तिन्ही व्हेरिअंटची किंमती 2 हजार रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. टिपस्टरने दिलेल्या माहितीनुसार, नवीन किंमती अनुक्रमे 22,999 रुपये, 24,999 रुपये आणि 26,999 रुपये असू शकतात.
तसेच, Vivo T4x च्या 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 15,499 रुपये, 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 16,499 रुपये आणि 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 18,499 रुपये आहे. मात्र टिप्सटरने दावा केला आहे की, 1 मार्चपासून 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 1,500 रुपयांनी वाढून 16,999 रुपये होऊ शकते, तर 8GB + 128GB आणि 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 2,500 रुपयांनी वाढून अनुक्रमे 18,999 आणि 20,999 रुपये होऊ शकते.
Vivo T4 प्रमाणे, iQOO Z10 च्या सर्व व्हेरिअंटची किंमत 2,000 रुपयांनी वाढू शकते. 8GB + 128GB मॉडेलची किंमत 24,999 रुपये, 8GB + 256GB मॉडेलची किंमत 26,999 रुपये आणि 12GB + 256GB मॉडेलची किंमत 28,999 रुपये असू शकते. यापूर्वी 8GB + 128GB मॉडेलची किंमत 22,999 रुपये, 8GB + 256GB मॉडेलची किंमत 24,999 रुपये आणि 12GB + 256GB मॉडेलची किंमत 26,999 रुपये ठेवली होती.
iQOO Z10R च्या सर्व स्टोरेज ऑप्शनमध्ये 2,000 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. यानंतर 8GB + 128GB मॉडेलची किंमत 22,999 रुपये, 8GB + 256GB मॉडेलची किंमत 24,999 रुपये आणि 12GB + 256GB मॉडेलची किंमत 26,999 रुपये होणार आहे. iQOO Z10x मध्ये Vivo T4x प्रमाणेच बदल पाहायला मिळणार आहेत. टिपस्टरने दिलेल्या माहितीनुसार, 8GB + 128GB आणि 8GB + 256GB मॉडेलची किंमत 2,500 रुपयांनी वाढून 18,999 रुपये आणि 20,999 रुपये होणार आहे. टिपस्टरने सांगितले की सुधारित किंमती 1 मार्चपासून लागू होतील. सध्या कंपनीने या संदर्भात अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही.






