फोटो सौजन्य - Social Media
सोशल मीडियावर काय-काय घडेल? याचा काही नेम नाही. येथे दररोज अशा गोष्टी घडत असतात, ज्याच्यावर विश्वास ठेवणे म्हणजे खूप कठीण काम! कारण येथे दिसून येणाऱ्या गोष्टी कधी कधी विश्वास ठेवण्याच्या पलीकडे असतात. एक तर या जादुई असतात किंवा एकप्रकारे Illusion असतात. डोळ्यांचा घात करून आपला विश्वास जिंकून घेणारे या गोष्टींना सोशल मीडियावर लवकर थारा मिळतो. अशामध्ये अशीच एक Video सोशल मीडियावर प्रचंड Viral होत आहे. मुळात, या व्हिडीओमध्ये स्टंट दाखवला गेला आहे, जो एका ट्रक ड्राइवरने केला आहे.
व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे की, “एक ट्रक ड्राइव्हर चालू ट्रकमधून बाहेर निघतो. तो ट्रकच्या पुढच्या बाजूने घोळका घालून दुसऱ्या बाजूने पुन्हा ट्रकमध्ये शिरतो. हा ट्रक आणि पुढे चालत असणारा ट्रक दोघांचेही स्पीड जवळजवळ सारखीच असते. पण हा पट्ठ्या एका चालू ट्रकच्या समोरून घोळका कसा घालू शकतो? असा प्रश्न व्हिडीओ पाहताना डोक्यात येतो.” पण काही नेटकऱ्यांनी जरा जास्तच डोके चालवून या प्रश्नाचे उत्तर शोधले आहे.
मुळात, या ड्राइव्हरने एक Illusuion वापरले आहे. Illusion म्हणजेच डोळ्यांचा घात! मुळात, तो ट्रक चालतच नाही आहे. ट्रक एकाच जागी स्तब्ध उभा आहे. मग प्रश्न पडतो की शेजारचा परिसर कसा मागे जात आहे? तर त्याचे उत्तर असे आहे की,”हे ट्रक एका RORO ट्रेनवर उभे आहे. Roro म्हणजे अवजड वाहनांची न्हे आण करणारी ट्रेन! हा ट्रकही अशा ट्रेनवर स्तब्ध-स्थिर उभा आहे आणि ट्रेन सुरु असल्यामुळे शेजारचा परिसर मागे जाताना दिसून येत आहे. याचा फायदा घेत, झटकन Viral होण्यासाठी पट्ठ्याने युक्ती लावत असा पराक्रम केला आहे.
संबंधित व्हिडीओ @viral_india.official या इन्स्टाग्राम हॅन्डलने शेअर केला आहे. सोशल मीडियावर ही व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पसरत आहे, तसेच असे अनेक व्हिडीओ येथे हजारोंच्या संख्येने प्रसिद्ध होत असतात.