(फोटो सौजन्य: Ai Created)
अमेरिकेतील होंडुरास आणि एल साल्वाडोर येथील तुरुंग जगातील सर्वात धोकादायक आणि भयंकर तुरुंगामध्ये मोडले जाते. इथली परिस्थिती इतकी भयानक आहे की अनेकदा जेलच्या आतमध्येच बऱ्याचदा मृच्यूंचा सडा पडतो. कैदी जेलमध्येही हत्या करायला मागेपुढे बघत नाही. त्यांच्या क्रुरतेपुढे तर सरकार देखील हताश होऊन हातावर हात ठेवून बसली आहे.
तुरुंगच बनलाय गँगस्टर्सचा अड्डा
रिपोर्टनुसार, होंडुरास आणि एल साल्वाडोरच्या अनेक तुरुंगांमध्ये धोकादायक ड्रग्स कार्टेल आणि टोळ्यांचा दबदबा आहे. . एमएस-13 आणि बॅरिओ 18 सारख्या कुख्यात टोळ्या केवळ शहरांच्या रस्त्यांपुरत्याच नाही तर तरुंगापर्यंत पसरल्या आहेत. होंडुरासमधील पत्रकार मार्सेल ऑर्सोटो यांच्या मते, या शहरांतील खचाखच भरलेले अनेक तुरुंग हे गँग लीडर्ससाठी तात्पुरती मुख्यालये सारखी बनली आहेत. तुरुंगात जेरबंद असलेले गँग लीडर्स मोबाईल आणि दुसऱ्या संसाधनांचा वापर करुन बाहेर असलेल्या आपल्या साथीदारांना खंडणी, हत्या आणि वसूलीसाठी आदेश देतात. एवढंच काय तर तुरुंगात बसून हे गँगस्टर्स मद्यापानाची तस्करी देखील करतात. हेच कारण आहे की, तुरुंगाच्या आत बऱ्याचदा गँगवार सुरु होते.
महिलांच्या तुरुंगावर हल्ला
होंडुरासमध्ये एक धक्कादायक घटना घडून आली होती ज्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. इथली राजधानी तेगुसिगाल्पाच्याजवळील महिलांच्या तरुंगावर सशस्त्र टोळीच्या सदस्यांनी हल्ला केला होता. रिपोर्ट्सनुसार, हल्लेखोरांनी तुरुंगाच्या आत अंदाधुंद गोळीबार करत अनेक कैदींनी घेरले होते. यावेळी परिस्थिती इतकी बिघडली होती की, हल्लेखोरांनी आग देखील लावत महिलांना पळून जाण्यापासून रोखले. या घटनेत 41 लोकांचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर तिथल्या प्रशासनाने देखील ही गोष्ट स्वीकारली की, तुरुंगातील प्रशासनाला या हल्ल्याची पूर्वमाहिती होती पण वेळेवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
काही रिपोर्ट्सनुसार, या गँगवारनंतर अनेक कैद्यांची मुंडकी छाटून त्याच्यासोबत फुटबाॅल खेळले जाते. या घटनांनंतर सरकारने मोठ्या स्तरावर छापे टाकले. झडतीदरम्यान पोलिसांना पिस्तूल, असॉल्ट रायफल, दारुगोळा, ग्रेनेड आणि मोठ्या प्रमाणात रोकड सापडली. इतकंच नाही तर तुरुंगातून माैल्यवान सोनं देखील जप्त करण्यात आलं. या घटनांवरुनच तिथल्या तरुंगात गुन्हेगारी टोळ्या किती सक्रिय आहेत याचा अंदाज लावला जाऊ शकतो.
एल साल्वाडोरचे तुरुंग अधिक भयानक
एल साल्वाडोरच्या तुरुंगाचे चित्रही फारच भयानक असल्याचे म्हटले जाते. सर्वात मोठ्या तुरुंगात, एस्पेरांझामध्ये, त्याच्या क्षमतेपेक्षा कित्येक पटीने जास्त कैदी आहेत. या तुरुंगाची क्षमता १० हजार कैदी ठेवण्यासाठी आहे पण इथे तब्बल ३० हजार कैद्यांना ठेवण्यात आलं आहे. अनेक रिपोर्ट्समध्ये असे सांगण्यात आले आहे की, इथल्या कैद्यांनी जेल गार्डची हत्या केली होती. अशा घटनांमुळेच तुरुंगातील कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांमुळे साल्वाडोरचे राष्ट्रपतीने तुरुंगातील व्यवस्थेला अधिक कठोर बनवण्यासाठी अनेक बदल केले. सरकारने एक विशाल दहशतवादविरोधी तुरुंग केंद्रही बांधले ज्यात हजारो धोकादायक गुन्हेगारांना ठेवले जाते. सरकारचे म्हणणे आहे की, आता तुरुंगात मोबाइल फोन, बेकायदेशीर सामान आणि टोळ्यांच्या एक्टिव्हिटीवर विशेष लक्ष देत त्यावर पूर्णपणे बंदी घातली जाईल. यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस आणि सैनिक तैनात करण्यात आले आहेत. होंडुरास आणि साल्वाडोर हे तुरुंग फक्त कैद्यांनी कैद करण्याचे ठिकाण नसून गुन्हेगारीचे प्रमुख केंद्र बनले आहे. गँगवार, गर्दी, शस्त्रांची तस्करी आणि प्रशासनावर टोळ्यांचा दबाव यामुळे हे तुरुंग जगातील सर्वात धोकादायक तुरुंगांमध्ये मोडले जाते.






