(फोटो सौजन्य: Instagram)
प्रेम हा एक अशी गोष्ट आहे जी कुणालाही कधीही होऊ शकते. प्रेमासाठी लोक संपूर्ण जगाशी लढतात हे आपण अनेकदा ऐकलं असेल पण प्रेमासाठी वाघाने एका राज्यातून दुसऱ्या राज्यात एंट्री घेतली हे तुम्ही ऐकलं आहे का? प्राण्यांमध्येही भरपूर प्रेम असतं आणि एका वाघाने त्याचं हे प्रेम सिद्ध करुन दाखवलं. ही घटना सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे ज्यात सांगण्यात आलं आहे की, वाघाने आपल्या जोडीदाराला भेटण्यासाठी महाराष्ट्रातून तेलंगणापर्यंतचा प्रवास पार केला. वाघ जोडीदाराच्या शोधात सुमारे ४० ते ५० किलोमीटर फिरत होता.
चोरी करायला गेलेल्या महिलेला दुकानदाराने धु धु धुतलं, कानशिलात लागावले तब्बल 17 थप्पड; Video Viral
माहितीनुसार, तेलंगणाच्या आदिलाबाद भागात ही अनोखी घटना घडली, जिथे वाघाने महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्राणहिता नदीत एक लांब उडी घेतली आणि आपल्या गंतव्यस्थानाच्या शोधात चालत राहिला. वन विभागाचे अधिकारी सुशांत सुकदेव यांच्या मते, इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, वाघ दरवर्षी प्रजनन हंगामात जोडीदार, अन्न आणि पाण्याच्या शोधात नदी ओलांडतात. हा वाघ त्यापैकी एक होता, जो प्रेमाच्या शोधात सर्व धोके पत्करण्यास तयार होता.
ही कथा वाघाच्या प्रेमाची गाथा स्पष्ट करते आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देखील देते. कागजनगर परिसर हा महाराष्ट्राच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला तेलंगणाच्या जंगलांशी जोडणारा एक प्रमुख व्याघ्र मार्ग आहे. अशा मार्गांमुळे वाघांसारखे दुर्मिळ प्राणी कोणत्याही अडथळ्याशिवाय जंगलात मुक्तपणे फिरू शकतात आणि त्यांचे नैसर्गिक संतुलन राखू शकतात. वन विभागाचे अधिकारी या वाघाच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवत असतात. दरम्यान व्हायरल झालेल्या वाघाची ही कथा ऐकून आता सर्वच थक्क झाले आहेत. अनेकांनी या घटनेवर आपले मत देखील व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “भाऊ प्रेमात पडलाय” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मनात इच्छा असले तर सर्व करता येतं” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “सीमा माणसांसाठी असतात.. त्यांना सीमा माहित नाहीत”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






