(फोटो सौजन्य – X)
काय घडलं व्हिडिओत?
सध्या सर्वत्र लग्नाचा सीजन सुरु आहे. इंटरनेटवरही लग्नाचे अनेक व्हिडिओ शेअर केले जात असातानाच एका व्हिडिओने मात्र सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. व्हिडिओमध्ये लाल रंगाची साडी घालून आजी गाण्यावर डान्स करताना दिसून आल्या. आज्जींचा हा डान्स इतका लक्षवेधी होता की त्यांच्या आजूबाजूला तरुणांची गर्दी दिसून आली. काहीजण हा डान्स बघण्यात मग्न झाले तर काहींनी आपल्या मोबाईलमध्ये हे दृश्य कैद केले. व्हिडिओमध्ये आज्जींची फ्लिप मात्र अधिक आकर्षक आणि अनपेक्षित ठरली ज्याने सर्वांनाच आश्चर्य केले. जीवनाच्या शेवटच्या टप्प्यातही आज्जींचा हा जोश आणि त्यांचा दणकेदार डान्स अनेकांना लाज आणण्यासारखा आहे.
Dadi ki age nahi, unke killer dance aur flip dekh bhai 😭 pic.twitter.com/VflSaI8vmX — Vishal (@VishalMalvi_) November 25, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @VishalMalvi_ नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘दादी अजून म्हातारी नाहीये, तिचा किलर डान्स आणि फ्लिप बघ भावा’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “वातावरणाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करताना आजीने एक स्टंट केला” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “फ्लिप मस्त होता” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “व्वा, काय डान्स केला आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






