(फोटो सौजन्य: X)
काय घडलं व्हिडिओत?
कासव, ससाची गोष्ट तर आपण अनेकदा ऐकली असेल. यात कासव हळूहळू चालूनही ससासोबतची शर्यत जिंकून त्यावर विजय मिळवतो. असाच एक व्हिडिओ अलीकडे शेअर करण्यात आला आहे ज्यात कासव आपल्या हुशारीने तरसाच्या हल्ल्यातून स्वतःची सुटका करताना दिसून येतो. तरस हा मुळातच चालाख प्रवृत्तीचा प्राणी आहे अशात त्याला शिकस्त देणे साधी गोष्ट नाही. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो यात एक तरस कासवाच्या चेहऱ्याला चाटत त्याला त्याच्या कवचातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो आणि यात तो यशस्वीही होतो. कासव तरसावर विश्वास ठेवत आपल्या कवचातून बाहेर येतो आणि तरस लगेचच त्याच्यावर हल्ला करतो. कासवही इथे आपली चलाखी दाखवतो आणि लगेच त्याच्या तावडीतून आपली सुटका करत कवचाच्या आत निघून जातो. अखेर तरसाचा डाव पलटतो आणि त्याला रिकाम्या होतीच तिकडून निघून जावे लागते.
This turtle will never trust a hyena again 😂😂😂 pic.twitter.com/JmFzcraIl2 — _Kangchi_😎 (@_Kangchi_8) January 26, 2026
शिकारीचा हा व्हिडिओ @_Kangchi_8 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “प्राण्यांचे आयुष्य कठीण आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कासवाने वेळीच हुशारी दाखवली” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “प्रेमासाठी तो जवळ जवळ मारणार होता”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






