फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायवला मिळतात.अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहिल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात की हसून पोट दुखून येते. कधी स्टंट, तर कधी जुगाड, कधी डान्स रिल्स तर कधी भांडणाचे असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर तुम्ही पाहिले असतील. याशिवाय तुम्ही अनेक लोकल ट्रेनचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील.
तुम्ही अनेकदा पाहिले असेल की काहीजण रिल बनवण्याच्या नादात धावत्या लोकल ट्रेनमध्ये धोकादायक स्टंट करतात. यामध्ये तरूण मंडळींचा समावेश असतो. त्यांचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतात. यामुळे समाजात चुकीचा संदेश पसरतो. यामुळे आता लहान मुलांचा देखील समावेश होत आहे. असे स्टंट करणाऱ्यांना बघून ही लहान मुले देखील स्टंट करत आहे. सध्या असाच काही लहान मुलांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या लहानग्यांनी धावत्या ट्रेनमध्ये स्टंट केला असून यामुळे त्यांच्या जीव धोक्यात येऊ शकतो.
ट्रेनच्या दरवाजात उभे राहून जीवघेणा स्टंट
व्हायरल होत असलेला व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक ट्रेन वेगाने धावत आहे. यामध्ये दोन लहान अल्पवयीन मुले ट्रेनला लटकत आहेत. ही लहान मुले ट्रेनच्या दरवाजात उभे राहून हात-पाय बाहेर काढत स्टंट करत आहेत. ट्रेन धावतानामध्ये खांब येते आहे. चुकून त्या लहानमुलांचा हात सुटला तर जीव धोक्यात येईल याची कसलीच भिती त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. अनेक प्रवासी त्यांनी आतमध्ये जाण्यास सांगत आहे. मात्र शायनिंगच्या नादात ही मुले कोणाचेही ऐकत नाही. हा व्हिडिओ प्रवाशांनी मोबाईलमध्ये शूट केलेला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
Local train me jaan lewa stunt@Central_Railway @RailMinIndia@RPF_INDIA @RailwaySeva @RPFCR@RPFCR @RPF_INDIA @RPFCRBB#localtrain #mumbai #mumbailocaltrain #mumbailifeline #lifeline #train #viralvideo #stunt pic.twitter.com/cNurEhzw75
— MUMBAI TV (@tv_mumbai) September 8, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @tv_mumbai या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ मुंबईचा असून हा कधीचा आहे याची कोणतीही माहिती नाही. अनेकांनी या व्हिडिओवर संतापजनक प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, कुठली आहेत ही पोरं, यांना काही अक्कल नाही का?, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, बाप रे! तिसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, यांना चांगले झोडपले पाहिजे म्हणजे पुन्हा असे करणार नाहीत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.