फोटो सौजन्य: सोशल मीडिया
सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. मागच्या काही दिवसांपासून मेट्रोतील अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये काही लोकांचे डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अनेकांनी नवीन आणि वेगळं कायतरी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाले आहेत. नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये दोन लोक एकमेकांशी भांडताना दिसत होते.
आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये एक वेगळेच दृश्य दिसत आहे. मेट्रो ट्रॅकवर धावणाऱ्या मेट्रो रेल्वेच्या आत बसलेल्या माकडाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर नेटकऱ्यांनी कमेंट सुध्दा केल्या आहेत. हा व्हिडीओ दिल्ली मेट्रोमधील असून लोकांचं अधिक लक्ष वेचतं आहे.
हे देखील वाचा- ऐकावं ते नवलच!चालत्या मेट्रोत तरुणाने केला योगा; लोक म्हणाले…
व्हायरल व्हिडीओ
तुम्ही सर्वांनी मेट्रोने प्रवास केला असेलच. दिल्ली मेट्रोनेही प्रवास केला असेल. कधी कधी तुम्ही मेट्रोमध्ये खूप गर्दी पाहिली असेल तर कधी खूप कमी प्रवाशांसोबत तुम्ही पाहिली असेल. पण तुम्ही कधी माकडाला मेट्रोतून प्रवास करताना पाहिलं आहे का? सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मेट्रोच्या आत एक माकड दिसत आहे. ड्रायव्हरलेस मेट्रोमध्ये हे माकड कधी सीटवर येताना तर कधी उडी मारून दुसरीकडे जाताना दिसत आहे. हे माकड मेट्रोच्या आत आले असावे आणि ते बाहेर जाण्यापूर्वी त्याचे दरवाजे बंद केले असावेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर Nationalcapitaldelhi नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला 26 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले – ‘हा एक तिकीट नसलेला प्रवासी आहे.’ तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘त्याला दर्शनासाठी झंडेवालानला जावे लागेल.’ एका युजरने ‘जय श्री राम’ लिहिले तर दुसऱ्या युजरने हसणारा इमोजी शेअर केला आहे.