फोटो सौजन्य: सोशल मीडिया
सोशल मीडियाच्या दुनियेत कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. काही व्हिडीओ आश्चर्यचकित करणारे असतात. तर काही व्हिडीओ इतके विचित्र असतात की पाहून मूड खराब होतो. तुम्ही मेट्रोशी संबंधित अनेक व्हिडिओ पाहिले असतील. भांडणाचे, किंवा मेट्रोत डान्स करतानाचे व्हिडीओ आपण पाहतो. अनेकवेळा असे व्हिडिओ समोर येतात जे आश्चर्यचकित करणारे असतात. काही व्हिडीओ पाहिल्यानंतर माणसाला आश्चर्य वाटते की हे खरेच घडू शकते का? नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक तरुण मेट्रोमध्ये ध्यान आणि योग करताना दिसत आहे.
खरंतर अलीकडे बदलत्या जीवनामुळे लोकांना शारिरीक आरोग्य तर बिघडलेच आहे. पण त्यासोबतच मानसिकरित्या देखील अनेकजण त्रासलेले आहेत. अशा परिस्थितीत लोक मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करण्याचे काम करतात. असाच हा व्हिडीओ आहे. हा व्हिडिओ प्रवाशांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू तर ठरलाच, पण सोशल मीडियावरही चर्चेचा विषय बनला आहे.
हे देखील वाचा- धक्कादायक! मेट्रोत अजगर घेऊन चढला व्यक्ती; प्रवाशांची उडाली घाबरगुंडी
मेट्रोमध्ये योगाभ्यास
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक युवक मेट्रोमध्ये योगा करत आहे. गर्दी असतानाही या तरुणाने ध्यान आणि योगाच्या माध्यमातून मानसिक शांतता राखण्याचा प्रयत्न केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा तरुण आपल्या मेट्रोच्या फरशीवर बसतो आणि पाईपच्या मदतीने वर जाण्याचा प्रयत्न करतो. तरुण ज्या पद्धतीने योगाभ्यास करतो ते धक्कादायक आहे. हे पाहून तिथे बसलेले लोक आश्चर्यचकित होतात. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रवाशांनी आणि ऑनलाइन दर्शकांनी तरुणाचे कौतुक केले. हा व्हिडिओ कोणत्या मेट्रोचा आहे हे स्पष्ट झालेले नाही.
व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक म्हणाले
या व्हिडिओवर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत. काही लोकांनी मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी हे एक चांगले पाऊल म्हटले, तर काहींनी मेट्रोसारख्या सार्वजनिक ठिकाणी असे उपक्रम राबविणे अयोग्य मानले. एका सोशल मीडिया युजरने लिहिले की, ‘लोक त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेत आहेत हे पाहून खूप आनंद झाला.’ तर आणखी एकाने म्हणले की, ‘मेट्रोचा प्रवास तणावपूर्ण असू शकतो आणि ते व्यवस्थापित करण्याचा हा एक सकारात्मक मार्ग आहे.’ तर एका दुसऱ्या युजरने केली, ‘मेट्रोमध्ये असे करणे योग्य नाही. यामुळे इतर प्रवाशांची गैरसोय होऊ शकते. योग आणि ध्यानासाठी घर किंवा पार्क ही चांगली ठिकाणे आहेत.’