आपल्या देशात प्रतिभावंत लोकांची काही कमतरता नाही. काही लोकांमध्ये प्रतिभा इतकी भरलेली असते की ते बघून तुम्हाला आश्चर्य वाटेल. बटाटा चिप्सचे रॅपर्स चिप्स खाल्यानंतर (Potato Chips Wrappers)आपण कचऱ्यात टाकून देतो. मात्र या रॅपर्सचा वापर करून एका महिलेने जे काही बनवले आहे ते पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूझर्सही हैराण झाले आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये महिला बटाटा चिप्सच्या पॅकेटपासून बनवलेली साडी (Saree made From Chips Packets) नेसलेली दिसत आहे. या महिलेने चिप्सच्या फॉइल रॅपरपासून साडी बनवली आहे. हा व्हिडिओ (Viral Video)पाहिल्यानंतर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
या महिलेने बटाट्याच्या चिप्सच्या रॅपरपासून साडी बनवली आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक चक्रावले आहेत. या अनोख्या साडीचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर BeBadass.in नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. युझरने कॅप्शनमध्ये लिहिले, की ब्लू लेज आणि साडीसाठी प्रेम. २१ जानेवारी रोजी अपलोड केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत साडेपाच हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. काही यूझर्सना हा व्हिडिओ मजेदार वाटला आहे तर काहींनी डोक्याला हात लावला.
[read_also content=”शाश्वत विकास, मानवधर्म आणि वसुंधरेसाठी सोबत करुया काम – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचे आवाहन https://www.navarashtra.com/maharashtra/kokan/mumbai/environment-minister-aaditya-thackeray-said-that-we-should-work-together-for-earth-nrsr-234755/”]
एका यूजरने कमेंट करत लिहिले की, ‘साड़ी हो तो ऐसी हो वरना ना हो.’ त्याचवेळी एक महिला यूजर म्हणते, की मी साडीप्रेमी आहे आणि मला ते अजिबात आवडले नाही. कला आणि सर्जनशीलतेच्या नावाखाली लोक काहीही करत असतात. आणखी एका यूझरने विचारताना लिहिले, की मॅडम तुम्ही साडी बनवली आहे, पण ती नेसून कुठे फिरणार? सध्या हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे.