(फोटो सौजन्य – X)
सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल तर इथे तुम्ही अनेक व्हायरल व्हिडिओ पाहिले असतील. हे व्हिडिओ बऱ्याचदा आपल्याला थक्क करून जातात तर कधी कधी आपल्याला हैराण करून सोडतात. इथे प्राण्यांच्या जीवनाशी संबंधित देखील बरेच व्हिडिओ शेअर केले जातात. या व्हिडिओजमधून आपल्याला प्राण्यांचे आयुष्य जवळून समजता आणि पाहता येते. प्राण्यांना डिवचने अनेकदा आपल्या अंगलड येऊ शकते याचीच प्रचिती देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यात व्यक्तीने कुत्र्याला हिणवताच त्याने रागात असे काही केले की पाहून सर्वांनाच धक्का बसला. यात नक्की काय घडले ते जाणून घेऊया.
काय घडले व्हिडिओत?
सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून लोक हैराण झाले आहेत. व्हिडिओच्या सुरवातीला एक माणूस स्कूटर चालवत बसून रस्त्यावर उभ्या असलेल्या कुत्र्याला डिवचण्याचा प्रयत्न करताना दिसून आला. सुरुवातीला कुत्रा शांतपणे तिथून निघून जातो, मात्र त्याने पुढे जे केले त्याने सर्वच हादरून उठले. व्हिडिओत पुढे असे दिसते की कुत्रा काहीच क्षणात आपली संपूर्ण गॅंग आणतो आणि व्यक्तीच्या नकळत त्याच्या स्कुटरवर हल्ला चढवतो. व्हिडिओमध्ये कुत्र्यांची ही गॅंग व्यक्तीच्या स्कुटरला अक्षरशः आपल्या दातांनी फाडताना दिसून आली. व्यक्तीला कुत्र्याशी पंगा घेणं चांगलंच महागात पडलं आणि त्याच यात मोठं नुकसान झालं हे नक्की…
Kalesh b/w Dogesh Gang and a Guy pic.twitter.com/sN3VUcjVT4
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) April 29, 2025
युजर्स मात्र आता व्हिडिओची चांगलीच मजा लुटत असून नेटकरी या टोळीला गंमतीने ‘डोगेश गँग’ म्हणत आहेत. हा व्हायरल व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. कुत्र्यांमधील ही एकता आणि सूडाची भावना पाहून सोशल मीडियावर अनेक लोक आश्चर्यचकित झाले आहेत, तर अनेकजण यावर मजेदार कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिले आहे, “काय सांगता, कुत्रे पण सूड घेतात” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पूर्ण प्लॅनींग करून हे केलं आहे वाटतं”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.