काय मुर्खपणा आहे! गॅस पेटवण्यासाठी तरुणाने असं काही केला की; VIDEO पाहून लोक म्हणाले... (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. जुगाडाचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. अनेकवेळा काही जुगाड असे असतात की माणसाच्या उपयोगी पडतील. तर काही जुगाड असे असतात की पाहून हसावे की रडावे कळत नाही. त्या जुगाडाचा काहीही उपयोग होत नाही. भारतात तर अनेक जुगाडू लोक तुम्हाला पाहायला मिळतील.
सध्या सोशल मीडियावर असाच एक जुगाडाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पण या जुगाडामुळे तरुणाचा जीव देखील जाण्याची शक्यता होती. यामध्ये तरुणाने गॅस पेटवण्यासाठी असे काही वापरले आहे की, पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. तरुणाने गॅस पेटवण्यासाठी ना लाइटरचा वापर केला ना ही काडेपेटीचा वापर केला. तर तरुणाने मच्छर मारण्याच्या रॅकेटचा वापर केला गॅस पेटवण्यासाठी केला आहे. वाचून धक्का बसला ना? पण हे खरं आहे. आता त्याने हे कसं केलं हे आपण जाणून घेऊयात.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण स्वयंपाक करत असतो. तुम्ही पाहू शकता की किचन कट्ट्यावर सामान पडलेले दिसत आहे. याच वेळी तरुण लाइटर शोधत असतो पण त्याला लाइटर सापडत नाही. मग याच वेळी तो मच्छर मारण्याचे रॅकेट घेतो. ते रॅकेट तो गॅसवर रॅकेट ठेवतो. नंतर एका चाकूला रॅकेटच्या जाळीमध्ये घालतो आणि गॅस पेटतो. यावेळी मोठा भडका देखील उडतो. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण आगीचा भडका जास्त मोठा असता तर यामुळे दुर्दैवी घटना देखील घडली असते.
व्हायरल बातम्या वाचवण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @raxarmy07 या अकाउंटवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने हा जुगाड भारतातून बाहेर गेला नाही पाहिजे असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युजरने आई घरी नसल्यावर मुलांना असे कांड सुचतात असे म्हटले आहे. आणखी एकाने हॉस्टेलवर असल्यावर असेच जुगाड करावे लागतात असे म्हटले आहे. तर अनेकांनी असा प्रकार न करण्याचा सल्ला दिला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, बजेट नाहीय भाऊ असे म्हटले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.