फोटो सौजन्य: सोशल मीडिया
Viral Video : सोशल मीडियावर अनेक थक्क करणारे व्हिडीओ येत असतात. हे व्हिडीओ पाहताना जगातले आठ नाही तर अनेक आश्चर्य असू शकतात याची खात्री पटते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडीओ आहे एका शेळीचा. या शेळीचा चक्क गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. या शेळीचा व्हि़डीओ नेटकऱ्यांनी चांगलाच डोक्यावर घेतला आहे. केरळमधील एका शेतकऱ्याची ही शेळी आहे. करूंबी नावाच्या एका पिग्मी शेळीने जगात इतिहास रचला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने तिची जगातील सर्वात लहान जिवंत शेळी म्हणून नोंद केली. करुंबीचे मालक, शेतकरी पीटर लेनू यांंच्या माहितीनुसार, पिग्मी शेळ्या इतरांपेक्षा लहान आहेत, परंतु त्यापैकी एकही जागतिक विक्रम करू शकेल याची त्यांना कल्पना नव्हती. जेव्हा त्याच्या शेतात आलेल्या एका पाहुण्याने करूंबीच्या लहान उंचीकडे लक्ष वेधले तेव्हा त्याने ते रेकॉर्ड करण्याचा निर्णय घेतला.
Meet Karumbi, the world’s smallest goat, who lives her life just 15 inches above the ground pic.twitter.com/pWQ09CLh6m
— Guinness World Records (@GWR) March 20, 2025
करुंबी ही एक काळी मादी पिग्मी बकरी आहे, जी फक्त 1 फूट 3 इंच 40.50 सेमी उंच आहे. ही शेळी चार वर्षांची असतानाही ती पिग्मी शेळ्यांच्या सरासरी आकारापेक्षा लहान होती पिग्मी शेळ्या साधारणपणे 21 इंच म्हणजेच 53 सेमी इतकी साधारण उंची असते. मात्र करूंबी शेळी त्याहूनही लहान आहे. तिची कमाल उंची 1.4 फूट म्हणजेच साधारणत: 2.७सेंमी आणि लांबी 1.1 फूट 33.5 सेंमी इतकी आहे.
करूंबीचा जन्म 2021 मध्ये झाला आहे. करूंबी इतर शेळ्यांपेक्षा वेगळी असली तरी तिला तिच्या शेतातील इतर प्राण्यांसोबत मिसळायला आवडते. या फार्ममध्ये गायी, ससे, कोंबड्या आणि बदके यांच्याव्यतिरिक्त तीन नर, नऊ मादी आणि दहा शेळ्या आहेत. लहान असूनही, करुंबी इतर प्राण्यांबरोबर देखील खेळत असते. या शेळीचा व्हिडीओ गिनिज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकृत एक्स अकाउंटवरुन शेयर करण्यात आला आहे. जगातील सर्वात लहान शेळी असं या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आलं आहे. करुंबीच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी चांगले डोक्यावर घेतले आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून या लहानग्या शेळीवर प्रेमाचा आणि कौतुरकाचा वर्षाव होत आहे.