सोशल मीडियावर दररोज कितीतरी व्हिडीओज व्हायरल होत असतात. यात बऱ्याचदा काही प्राण्यांचे देखील व्हिडिओ सामील असतात. यात प्राण्यांची थरारक लढत किंवा शिकारीचे काही भीतीदायक दृश्ये दिसत असतात, जे पाहून आपल्याला आशचर्याचा धक्का बसेल. सध्या असाच एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो मगरीच्या हल्ल्याशी संबंधित आहे. या व्हिडिओमध्ये मगर मागून येऊन एका तरुणाची शिकार करत असल्याचे दिसून येते. व्हिडिओतील दृश्ये तुमच्या अंगावर काटा आणण्यासाठी पुरेशी आहेत.
मगरीच्या एका थरारक शिकारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात अचानक एक मोठी मगर एका मुलाला आपल्या भक्षक जबड्यात पकडून पाण्यात ओढते. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कोणाचाही आत्मा हादरून जाईल. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक मुलगा तलावाच्या काठावर उभा आहे आणि फोटो काढण्यात व्यस्त आहे. त्याचवेळी त्याच्या जवळ एक मुलगी उभी आहे, जी हा क्षण कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न करत होती. पण तेवढ्यात पाण्यातून एक मोठी मगर बाहेर येते आणि मुलाला पकडते. हे पाहून मुलीचे भान सुटते आणि ती पूर्णपणे घाबरते.
काय आहे व्हिडिओत?
सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये असे दिसून येते की, मगरीने मुलाला पकडताच त्याने लगेच त्याला तलावाच्या खोल पृष्ठभागाकडे खेचण्यास सुरुवात केली. मुलगा ओरडतो आणि पाण्यात पडतो, पण मगर त्याला आपल्या ताकदीने धरून त्याच्या दिशेने खेचत राहते. हे दृश्य पाहून तरुणी घाबरली आणि तिने लगेच मदतीसाठी आरडाओरडा केला. पण घटना एवढी अचानक घडली की काय करावे हे कोणालाच समजले नाही. यावेळी पाण्याजवळ उभ्या असलेल्या इतर लोकांनाही आश्चर्य आणि धक्का बसला, कारण हा हल्ला इतक्या वेगाने झाला की कोणीही यावर करू शकले नाही. ही घटना नक्की कुठली आहे याबाबत मात्र कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
मगरीच्या थरारक शिकारीचा हा व्हिडिओ @enamul___hoqe नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी व्हिडिओवर कमेंट्स करत घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मला खरे वाटत नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ते खरे नाही. तो स्वाभाविकपणे तसा पडणार नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.