(फोटो सौजन्य: X)
सोशल मिडियाच्या जगात कधी काय दिसून येईल ते सांगता येत नाही. इथे नेहमीच अनेक धक्कादायक, थक्क करणारे तसेच आपल्याला क्षणात हसवतील असे व्हिडिओज व्हायरल होत असतात. आपण केलेला शहाणपणा कधीकधी आपल्याच अंगलड येऊ शकतो आणि असेच काहीसे महिलेसोबत घडल्याचे व्हिडिओत दिसून आले आहे. वास्तविक यात एक महिला बकरीसोबत रील बनवण्याचा प्रयत्न करताना दिसते पण तितक्यातच बकरी तिच्यासोबत असं काही करते की पाहून सर्वांनाच हसू अनावर होते. बकरीला गृहीत धरणं महिलेला चांगलंच महागात पडतं. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
कोल्ह्याला पंजात पकडलं अन् वादळात वाऱ्यासह आकाशात विलीन झाला गरुड, शिकारीचे थरारक दृश्य… Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, एक मुलगी रील बनवताना दिसून येत आहे. यावेळी एक बकरी तिच्या मागे उभी असते. महिला त्या बकरीला आपल्या रीलमध्ये सामील करण्याचा प्रयत्न करते पण तितक्यातच बकरीला राग अनावर होतो आणि ती रागातच महिलेच्या दिशेने धाव घेते. बकरीसारखा लहान प्राणी आपल्याला काहीही करणार नाही या विचाराने महिला न घाबरता आपली रील बनवत राहते पण शेवटी बकरी आपला संपूर्ण राग तिच्यावर काढते आणि आपल्या शिंगानी तिच्या डोक्यावर जोरदार प्रहार करते. या हल्ल्यामुळे महिला क्षणातच पुढे ढकलली जाते, ज्यानंतर ती बकरीपासून दूर पळून जाताना व्हिडिओत दिसून येते. रीलच्या बनवणयाच्या नादात लोक आजूबाजूच्या परिस्थितीचे भान ठेवत नाही आणि मग परिणामी त्यांच्यासोबत नको ते घडून बसते.
The influencer who wasn’t able to calculate the length of the rope.pic.twitter.com/GFEbw2MQfr — Massimo (@Rainmaker1973) October 27, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @Rainmaker1973 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मी या महिलेला ओळखते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ती बकरीपासून दूर राहिली असती तर तिचा व्हिडिओ चांगला बनला असता पण तिला जवळच जायचे होते” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “बकरीच्या बरोबर तेच केले”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






