(फोटो सौजन्य: X)
प्राणी-पक्ष्यांमध्ये शिकारीचे दृश्य दिसणे फार सामान्य गोष्ट आहे. ते सुरुवातीपासूनच एकमेकांवर अवलंबून असतात, मोठे शिकारी लहान कमकुवत प्राण्यांची शिकार करणार हा जंगलाचा नियम आहे. जंगलातील काही धोकादायक शिकारी म्हणून जसं वाघाला आणि सिंहाला ओळखलं जात अगदी त्याचप्रमाणे गरुड हा आकाशातील धोकादायक शिकाऱ्यांच्या यादीत समाविष्ट होतो, त्याचा वेग आणि ताकद यामुळे तो क्षणार्धात आपल्या भक्ष्याला मृत्यूच्या दारी पोहचवतो.
अशातच आता गरुडाच्या नव्या आणि थरारक शिकारीचे दृश्य सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहे ज्यात गरुड जंगलातील चपळ प्राणी म्हणजेच कोल्ह्याची शिकार करताना दिसून आला. मुख्य म्हणजे, त्याने कोल्ह्याला आकाशात उचलून त्याची हवेतच त्याची शिकार केली जे पाहून सर्वच थबकले. व्हिडिओतील हे दृश्य पाहण्यासारखे होते ज्यामुळे कमी वेळेतच ते व्हायरल झाले. चला व्हिडिओत काय घडलं ते जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
गरुड जंगलातील इतक्या मोठ्या प्राण्यांचीही शिकार करु शकतो हे दृश्य सर्वांनाच आश्चर्य देणारे होते. गरुडाची अनोखी आणि थरारक स्टाईल पाहण्यासाठी प्रेक्षणीय ठरली. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता, यात जंगलात एक वादळ सुरु असल्याचे दिसते आणि यातच एक गरुड पर्वतावर उभं राहून उडण्यासाठी सज्ज होताना दिसून येतो. जेव्हा तो अवकाशात झेप घेतो तेव्हा तो एकटा हवेत उडत नाही तर आपल्या पंजात त्याने पकडून ठेवलेल्या गरुडालाही पंजात पकडून तो हवेत झेप घेतो. हे दृश्य इतके अद्भुत आहे की पाहणाऱ्यांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. आजूबाजूचे नाट्यमय दृश्य ढग, वादळ आणि बाजूने येणारी हवा या दृश्यांना आणखीनच मजेदार आणि रंगतदार बनवते. जणू कोणत्या चित्रपटाचा सीनच सुरु असल्यासारखे हे दृश्य दिसू लागते. गरुडाची ही शिकार आता सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल होत असून लोक या दृश्यांचा व्हिडिओ इंटरनेटवर शेअर करु लागले आहेत.
The strength of a golden eagle carrying a fox in heavy wind 😧😧 pic.twitter.com/ujlEn0KEdg — Damn Nature You Scary (@AmazingSights) October 21, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @AmazingSights नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “किती महान शक्ती” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “गरुड इतक्या मोठ्या प्राण्याला कसं उचलू शकतो” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे एआय वाटत आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






