फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर रोज चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ आपण पाहतो जे पाहिल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहिल्यावर आपण हसावे की रडावे ते कळत नाही. तुम्ही खाण्यापिण्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील. कोणी रेसिपींचे व्हिडिओ बनवतो, तर कोणी कुठे काय खायला प्रसिद्ध आहे याचा व्हिडिओ बनवतो.
सध्या एक असाच अनोखा व्हिडिओ पाहायला मिळत आहे जो पाहिल्यावर अनेकजण वेडे झाले म्हणायला हरकत नाही. या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे. हा व्हिडिओ जवळजवळ 9 कोटी लोकांनी पाहिला आहे. एका व्यक्तीने एकच पॉपकॉर्न बनवला आहे.या व्हिडिओने शेवटपर्यंत लोकांना अडकवून ठेवला आहे. पॉपकॉर्न बनवणाऱ्या महिलेच्या या व्हिडिओला ८.८ कोटी व्ह्यूज मिळाले आहेत आणि हा आकडा वाढत आहे. व्हिडिओला 1.8 मिलियन लाईक्स आणि 36 हजार कमेंट्स मिळाल्या आहेत. 30 हजार लोकांनी ते शेअरही केले आहे.
व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक महिला तव्यावर एक पॉपकॉर्न ठेवते. त्यांनंतर त्यावर तेलाचा एक थेंब टाकते. मग त्यावर थोडे मीठ टाकते आणि पॉपकॉर्न पॉपकॉर्न पॉप होईपर्यंत लाकडी चमच्याने ढवळते. महिलेने या व्हिडिओचे कॅप्शनही लिहिले आहे- 1 पॉपकॉर्न बनवा. हा व्हिडिओ लोकांनी पॉपकॉर्न पॉप होतो की नाही ते बघण्यासाठी शेवटपर्यंत पाहिला. हा व्हिडिओ अलोनालोवेन नावाच्या महिलेने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर आपल्या मजोशीर प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, मी हा व्हिडिओ पूर्ण पाहिला, दुसऱ्या एकाने म्हटले आहे की, या सस्पेन्सने मला जळजवळ मारूनच टाकेल. तिसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, माझे धैर्य पहा, मी ते पूर्ण पाहिले आहे. तर आणखी एकाने म्हटले आहे की, मी माझ्या मानसिक स्थितीबद्दल चिंतित आहे