धक्कादायक! महिला वॉशरुममध्ये, ट्रेनवर चढले ४० लोकं, दरवाजा बंद अन्... पुढं जे घडलं भयंकर, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
या व्हिडिओमध्ये महिला एका ट्रेनच्या वॉशरुममध्ये असल्याचे कळते. महिलेने वॉशरुमचे दार आतून बंद केले आहे. महिलेने म्हटले आहे की, कोटिहारी स्टेशनवर ट्रेन थांबली असताना अचानक काही पुरुष ट्रेनमध्ये चढले होते. ज्यामुळे दरवाजा बंद झाला. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दरवाज्याबाहेरुन काही लोकांचा मोठ्या मोठ्याने हसण्याचा आवाज येत आहे. महिलेने याची तक्रार देखील नोंदवली. महिलेने सांगितले की, ती बराच वेळ वॉशरुममध्ये अडकली होती. बाहेरुन दरवाजा घट्ट करुन टाकण्यात आळा होता. महिलेने हेल्पलाइन नंबरवर कॉल केल्यानंतर RPF जवान विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना बाहेर काढले. यानंतर महिला सुरक्षितपणे बाहेर पडली.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @indiainlast24hr या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ कॅप्शनमध्ये या घटनेची माहिती देण्यात आली आहे. सध्या या घटनेवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच अनेक महिलांना प्रवास करताना अशा घटना सतत घडतात असे म्हटले आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






