(फोटो सौजन्य: Ai Created)
कुठे आहे हा भयावह रस्ता?
आम्ही तुम्हाला सांगतो की, हा रहस्यमय आणि भितीदायक रस्ता रुसच्या सायबेरिया भागात बांधण्यात आला आहे. याचे नाव कोलयमा हाईवे (Kolyma Highway) असे आहे. हा रस्ता साधारण 2,025 किलोमीटर लांब असून तो रुसच्या सर्वात थंड आणि निर्जन भागातून जातो. इथले वातावरण इतके थंड असते की वर्षातील अनेक महिने येथील रस्ता बर्फाच्या मोठ्या चादरीने भरलेला असतो. इथे बऱ्याचदा वातावरण -50 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहचते. या हायवेला जगातील सर्वात धोकादायक रस्त्यांमध्ये गणले जाते. दूरपर्यंत पसरलेला बर्फ, निर्जन रस्ता आणि भयानक इतिहास या ठिकाणाला आणखी धोकादायक बनवते.
हुकूमशहाने केली होती रस्त्याची निर्मिती
रस्त्याच्या इतिहासाविषयी बोलणे केले तर, हा रस्ता सोवियन यूनियनचा तानाशाह जोसेफ स्टालिनच्या शासनकाळात बांधण्यात आला. 1930 च्या दशकात लाखो कैद्यांना सक्तीच्या मजुरीसाठी सायबेरियाला पाठवण्यात आले. या कैद्यांना ‘गुलाग’ नावाच्या श्रम छावण्यांमध्ये अत्यंत कठीण परिस्थितीत ठेवण्यात आले. कडाक्याची थंडी, उपासमार, आजार आणि सततच्या कामामुळे अनेक कैदी काम करता करताच मृत्यूमुखी पडले. त्यावेळी परिस्थिती इतकी हालाकीची होती की कैद्यांनी वेगवेगळे दफन करण्यासाठीही वेळ मिळत नव्हता.
सांगितलं जातं की, मृत पावलेल्या कैद्यांच्या मृतदेहाला रस्त्याच्या खालीच दफन करण्यात आलं. हेच कारण आहे ही या हायवेला “रोड ऑफ बोन्स” च्या नावाने ओळखलं जातं. या रस्त्याच्या आत त्या लाखो कैद्यांचा मृतदेह पुरण्यात आल्याची मान्यता आहे. हा हायवे आजही सुरु असून इथे बऱ्याचदा मानवी हाडे आणि सांगाडे आढळून आल्याच्या बातम्या समोर येत असतात. रस्त्याला मजबूत बनवण्यासाठी माती आणि दगडांसह इथे मानवी हाडांचा वापर केल्याचे सांगितले जाते. काही रिपोर्ट्सनुसार, या रस्त्याच्या निर्मितीवेळी जवळपास 10 लाख लोकांचा मृत्यू झाला होता. या मजुरांची, कैद्यांची मेहनत आणि त्यांचे शरीर सर्वकाही या रस्त्यात पुरले गेल्याचे सांगितले जाते.
View this post on Instagram
लोकांमध्ये आजही दहशत
आजही जेव्हा लोक या हायवेवरुन आपली गाडी नेतात तेव्हा त्यांच्या मनात एका वेगळ्या प्रकारची भिती असते. हा एक साहसी रोड म्हणून देखील प्रसिद्ध आहे. हा रस्ता केवळ एक रस्ता नसून तो लाखो लोकांच्या मृत्यूची कथा व्यक्त करतो. इथले थंड वातावरण पाहता लोकांचा कसा तडफडून इथे मृत्यू झाला असावा याची कल्पना केली जाऊ शकते.






