(फोटो सौजन्य: Instagram)
काय आहे प्रकरण?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला एक सूनबाई तिच्या सासूला डोक्यावर बसवून प्रदक्षिणा घालताना दिसेल. माहितीनुसार, वृद्ध सासूबाईंची खूप दिवसांपासूनची इच्छा पूर्ण करण्यासाठी सूनेने हे पाऊल उचलले. सासूचे वय झाल्याने शारीरिकदृष्ट्या ती ही परिक्रमा करु शकता नव्हती ज्यामुळे सूनेने ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. तिने सासूला एका टबमध्ये बसवत हा टब आपल्या डोक्यावर घेतला आणि 84 कोसांची प्रदक्षिणा यशस्वीपणे पूर्ण केली.
या घटनेने लोकांना इतकं थक्क केलं ही व्हिडिओत बाजूला अनेक लोक थांबून हे दृष्य पाहताना दिसले. तर काहीजण हे दृष्य आपल्या कॅमेरात कैद करताना दिसले. कलियुगात अशी सून मिळणं म्हणजे दुर्मिळंच म्हणावं लागेल. आजकाल पोटचा मुलगा आई-वडिलांना सांभाळण्यास नकार देतो, अशात सुनेने केलेली ही कामगिरी खरोखर प्रशंसनीय आहे. सोशल मिडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून कमेंट्समध्ये आता सुनेवर काैतुकाचा वर्षाव होत आहे.
ब्रज धाम में दिखी बहुओं की श्रवण कुमार, सास को सिर पर बैठाकर पूरी की 84 कोसी परिक्रमा #upnews #brajdham #viralvideo #mathura #vrindavan pic.twitter.com/m0xx7ewm31 — UP NEWS (@upnews_network) June 2, 2026
हा व्हिडिओ @upnews_network नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची सविस्तर माहिती देण्यात आली असून अनेक यूजर्सने या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “खरंच, आजकाल कोणी सासूला पाण्याचा ग्लास उचलून देत नाही, तिने सासूला डोक्यावर घेऊनच आपली सगळी कामं केली”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “प्रत्येक सून इतकी छान वागली तर किती बरं होईल” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “फारच छान”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






