(फोटो सौजन्य – Instagram)
सोशल मीडियावर नेहमीच अनेक वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ कधी आपले मनोरंजन करतात तर कधी आपल्याला धक्का देऊन जातात. आताही इथे एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यातील दृश्ये तुमच्या पायाखालची जमीन हादरवतील. यात एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडला खुश करण्यासाठी अक्षरशः जीवाचा खेळ मांडला. घटनेत नक्की काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे प्रकरण?
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ तुमचंही डोकं चक्रावून टाकेल. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो, एक मुलगा आपला टी-शर्ट वर करून आपले पोट दाखवत आहे. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य देखील असते. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, यात तरुणाच्या पोटावर अनेक बँडेज लावलेल्या दिसत आहेत. यावेळी एक माणूस त्याचा हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असतो आणि मुलगा हसत राहतो. यानंतर व्हिडिओ रेकॉर्ड करणारा माणूस म्हणतो, “एक तरुण मेट्रोच्या इथे भेटला मला. या मुलाने एका मुलीसाठी आपली किडनी विकली. फक्त आयफोन 16 प्रो तिला घेऊन देण्यासाठी त्याने आपली किडनी विकली”.
व्हिडिओत केलेल्या दाव्यानुसार, व्यक्तीने खरंच आपली किडनी एका स्मार्टफोनसाठी विकली असेल तर ही एक चिंताजनक बाब आहे. आजकाल लोक आपल्या क्षणिक आनंदासाठी नको ते प्रकार करू पाहतात. असे करताना आपला जीव देखील धोक्यात येऊ शकतो हा विचार ते करत नाही, हे फार दुर्दैवी आहे. व्यक्तीने आपल्या जीवाचा विचार न करता एका फोनसाठी आपली किडनी विकली. आपल्याला शरीराचा एक एक अवयव आपल्यासाठी महत्त्वाचा असतो अशात त्यांचा असा बाजार बसवणे एक चिंतेची बाब आहे. दरम्यान युजर्सने मात्र तरुणाच्या या दाव्यावर शंका व्यक्त केली आहे. काही पट्ट्या लावल्याने किडनी विकले असे होत नाही असे युजर्सचे म्हणणे आहे.
हा व्हायरल व्हिडिओ @kiddaan नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीची माहिती देण्यात आली आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून अनेकांनी कमेंट्समध्ये घटनेविषयीचे आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “जर तुम्ही थोडा अभ्यास केला असता तर तुम्हाला कळले असते की मूत्रपिंड कुठे आहे!” दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरे भावा थांबला असता थोडा, आयफोन 17 येत आहे, गर्लफ्रेंडला जुना मॉडेल दिलास”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.