फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियाच्या जगात कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. आपल्याला रोज लाखो व्हिडिओ पाहायला मिळतात. कधी डान्स रील्स, कधी जुगाड तर स्टंटचे असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. स्टंट व्हिडिओ तर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ समोर येतात जे पाहून अनेकांचा थरकाप उडतो. सध्या असाच एक स्टंट व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओने लोकांना थक्क करून सोडले आहे.
एका तरूणाने असा धोकादायक स्टंट केला आहे की, यामुळे त्याचा जीव जाण्याची देखील शक्यता आहे. अनेकदा असे व्हिडिओ विचार करायला भाग पाडतात की हे सगळे कशासाठी फक्त फेमस होण्यासाठी लाईक्स मिळवण्यासाठी. असे वाटते की जीव एवढा स्वस्त झाला आहे का? हा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील धास्ती भरेल. व्हिडिओमध्ये तरूणाने नाकावर आरी ठेवून धोकादायक स्टंट केला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण आरी घेऊन स्टंट करताना दिसत आहे. तो आरीला दोरी बांधून त्याच्या दोन टोकांना दोन सिलिंडर बांधले तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. तो तरूण ती आरी नाकावर ठेवतो आणि सिलेंडर उचलायला लागतो. हा स्टंट किती धोकादायक आहे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. हा स्टंट करताना थोडीशीही चूक झाल्यास तरुणाचा जागीच मृत्यू होऊ शकतो. हा व्हिडिओ पाहून कोणाच्याही मनात धडकी भरू शकते. अशा प्रकारच्या व्हिडिओंमुळे तरुणांना धोकादायक स्टंट करण्याची प्रेरणा मिळते, हे चिंताजनक आहे. त्यामुळे सोशल मीडियावर अशा प्रकारचे व्हिडिओ प्रसारित होऊ नयेत यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.
हे देखील वाचा- पाणी भरण्यावरून महिलांमध्ये जोरदार हाणामारी; एकमेकींवर हंडे फेक, पाहा व्हिडिओ
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रावर giantthedheeraj शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे आणि त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने म्हटले आहे की, ‘आज जर तुम्हाला व्हायरल व्हायचे असेल तर असा स्टंट करा की तो तुमचा जीव घेऊ शकेल.’ दुसऱ्या एका यूजरने, ‘पोलिसांनी या व्यक्तीवर कारवाई करायला हवी’ असे म्हटले आहे. तिसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, सोशल मीडियावर स्टार बनण्याच्या नादात आज अनेकांनी आपला जीव गमावला आहे. अशा अनेक प्रतिक्रीया लोकांनी दिल्या आहेत.
हे देखील वाचा- Viral Video: पोलिसांपासून वाचण्यासाठी विजेच्या तारेला लटकला चोर पण…; पाहा व्हिडिओ
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.