मलेशियामध्ये प्रशिक्षणादरम्यान नौदलाच्या दोन हेलिकॉप्टरची टक्कर, 10 जणांचा मृत्यू!

मलेशियातील लुमुट नौदल तळाजवळ नौदलाचा सराव सुरू होता. मलेशियन नौदलाजवळ दोन हेलिकॉप्टर एकमेकांवर आदळल्याने मोठा अपघात झाला आहे.

    मलेशियामधून मोठी बातमी समोर येत आहे. मलेशियातील नौदल तळाजवळ एक मोठी दुर्घटना घडली आहे. प्रशिक्षणादरम्यान उड्डाण घेताच नौदलाच्या दोन हेलिकॉप्टरची टक्करन(Malaysia Helicopter Crash) झाली.  या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. मलेशियातील लुमुट नौदल तळाजवळ नौदलाचा सराव सुरू होता.

    मिळालेल्या माहितीनुसर, मंगळवारी रॉयल मलेशियन नेव्ही परेडच्या तालीम दरम्यान दोन हेलिकॉप्टर हवेत मध्यभागी धडकले. या अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला. नौदलाने सांगितले की, अपघाताच्या वेळी हेलिकॉप्टरमध्ये 10 क्रू मेंबर्स उपस्थित होते. पश्चिमेकडील पेराक राज्यातील लुमुत नौदल तळावर मंगळवारी सकाळी ९.३२ वाजता (०१३२ जीएमटी) हेलिकॉप्टरची टक्कर झाली.

    नौदलाने सांगितले की, 10 क्रू मेंबर्स जागीच मरण पावले. त्यांना ओळखण्यासाठी लुमुट आर्मी बेस हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे.