(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
गेल्या आठवड्याच्या सुरुवातील अमेरिकेने इराणला पीस प्रपोजल पाठवला होता. यामध्ये स्ट्रेट ऑफ होर्मुझ उघडण्याची आणि अण्वस्त्र कार्यक्रमावर चर्चा सुरु करण्याची अट घालण्यात आली होती. पाकिस्तानच्या मध्यस्थीने हा प्रस्ताव इराणला पाठवण्यात आला होता.
दरम्यान रविवारी(१० मे) इराणने अमेरिकेच्या प्रस्तावर प्रत्युत्तर पाठवले आहे. या उत्तरात इराणने लेबनॉनवरील हल्ले थांबवण्याचे आणि होर्मुझमध्ये इराणी जहाजांची नाकेबंदी हटवण्याची मागणी केली आहे. मात्र ट्रम्प यांना या अटी असामाधानकारक वाटल्याने त्यांना हा प्रस्ताव धुडकावून लावला आहे.
ट्रम्प यांनी प्रस्ताव नाकारताना इतिहासाचा उल्लेख केला. त्यांनी ट्रुथवरील पोस्टमध्ये म्हटले की, गेल्या ४७ वर्षांपासून इराण अमेरिकेशी गेम खेळत आहे. आमच्या निरापराध नागरिकांचे बळी घेत आहे, आमच्यावर जगासमोर हसत आहे. अमेरिकेला ताटकळत ठेवून केवळ वेळकाढूपणा सुरु आहे. हे आम्हाला मान्य नाही असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांनी इराणचा केवळ प्रस्ताव फेटाळलेला नाही. तर इराणला गंभीर इशाराही दिला आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की, अमेरिकेने इराणमध्ये आपले ७०% उद्दिष्ट पूर्ण केले आहे. आता उर्वरित टार्गेटवर कारवाईची वेळ आली आहे. इराणचे अणु तळ सध्या अमेरिकेच्या रडारवर असल्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.
त्यांनी म्हटले की, इराणचे उर्वरित युरेनियम साठ्यांची ठिकाणे आम्हाला माहित आहे. जर कोणी त्या ठिकाणांच्या जवळ गेला तर त्याची आम्हाला लगेच माहिती मिळेल आणि त्याला क्षणात ठार केले जाईल असा कडक इशारा ट्रम्प यांनी दिला.
Ans: ट्रम्प यांच्या मते, इराण गेल्या ४७ वर्षांपासून अमेरिकेची दिशाभूल करत आहे. इराणने पाठवलेला प्रस्ताव केवळे एक गेम असून अमेरिकेच्या अटी मान्य न करता, केवळ दबाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे इराणचा प्रस्ताव पूर्णपणे नामंजूर असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
Ans: इराणने पाकिस्तानमार्फत पाठवलेल्या नव्या प्रस्तावात युद्ध संपवण्याची तयारी दर्शवली होती. यासाठी लेबनॉनवरील हल्ले थांबवण्याची आणि होर्मुझमधील नाकेबंदी हटवण्याची अट होती.
Ans: इराणने आपला अण्वस्त्र कार्यक्रम बंद करावा, अन्यथा त्यांच्या उर्वरित युरेनियम साठ्यावर हल्ला केला जाईल असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.






