त्या विमान अपघातात 67 प्रवाशांचा मृत्यू, व्हाइट हाऊसपासून फक्त ३ किलोमीटरवर दुर्घटना
अमेरिकेची राजधानी वॉशिंगटन डीसीच्या रीगन नॅशनल विमानतळाजवळ अमेरिकेन एअरलाइन्सचं विमान आणि हेलिकॉप्टरची धडक बसली होती. त्यानंत विमान आणि हेलिकॉप्टरचे अक्षरश: तुकडे झाले. या भीषण अपघातात ६८ जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती अमेरिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. व्हाइट हाऊस पासून केवळ तीन किलोमीटर अंतरावर ही दुर्घटना घडली आहे.
वॉशिंगटन डीसीच्या ‘फायर’ प्रमुखांनी सांगितलं की, ‘विमान आणि हेलिकॉप्टरच्या धडकेनंतर झालेल्या अपघातात ६७ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात विमान आणि हेलिकॉप्टरमधील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. वॉशिंगटन डीसी फायर अँड ईएमएसचे प्रमुख जॉन डोनली यांनी सांगितलं की,’आम्ही लोक रेस्क्यू ऑपरेशनला आता रिकव्हरी ऑपरेशनमध्ये बदलत आहोत.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या इगल विमान आणि ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला. रीगन विमानतळाजवळ हा भीषण अपघात झाला. विमानातील सर्व प्रवासी आणि चालक टीममधील सर्व सदस्यांचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातानंतर रेस्क्यू टीम रिकव्हरी ऑपरेशनच्या मागे लागली आहे. सुरुवातीला रेस्क्यू पथकाने १९ मृतदेह बाहेर काढले होते.
मीडिया रिपोर्टनुसार, या विमानाची प्रवासी क्षमता ६५ जणांची होती. अपघातावेळी विमानात ६४ प्रवासी होते. या अपघातात हेलिकॉप्टरमधील तिघांचा मृत्यू झाला आहे. विमानाचं लँडिग होताना हा अपघात झाला आहे. या विमानाने अमेरिकी सैन्य दलाच्या ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. विमान आणि हेलिकॉप्टर एकमेकांना धडकून पोटोमॅक नदीत कोसळले.
भीषण अपघातानंतर विमान आणि हेलिकॉप्टर नदीत कोसळलं. विमानामध्ये एकूण ६४ प्रवासी होते. या अपघाताताची माहिती मिळताच घटनास्थळी मदतकार्य सुरु करण्यात आलं. हेलिकॉप्टरला विमानाने धडक दिली, ते हेलिकॉप्टर अमेरिकेच्या सैन्य दलाचे होते. या अपघातानंतर विमानतळ तातडीने बंद करण्यात आलं. अपघाताची घटना घडलेलं विमानतळ आणि व्हाइट हाऊसमध्ये फक्त ३ किलोमीटरचे अंतर आहे.
प्रयागराज महाकुंभमेळ्यातून मोठी बातमी समोर येत आहे. महाकुंभमध्ये पुन्हा काही भागात भीषण आग लागली आहे. प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू आहे. सेक्टर 22 मध्ये भीषण आग लागली आहे. या भीषण आगीत अनेक तंबू जळून खाक झाल्याची माहिती समोर येत आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.ही आग इतकी भीषण आहे की आजूबाजूच्या संपूर्ण परिसरात काळ्या धुराचे लोट पसरले आहेत. तसेच, अग्निशमन दलाच्या पथकाने आजूबाजूचा संपूर्ण परिसर रिकामा केला आहे.
ज्या ठिकाणी आग लागली आहे. त्या ठिकाणी जास्त गर्दी नसल्याचे समोर येत आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. महाकुंभमध्ये सेक्टर 22 मध्ये भीषण आग लागली आहे. या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी दाखल झाले आहेत. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. लवकरच आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश मिळेल असा विश्वास तेथील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.